शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पालिकेच्या शाळेत शिक्षकांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:53 IST

तब्बल १५०१ शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान

पुणे : शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्येशिक्षण घेणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याने महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सध्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल १ हजार ५०१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.पुणे शहरातील महापालिकेच्या एकूण शाळा, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आदी बाबत सद्यस्थितीची माहिती नगरसेविका छाया मारणे यांनी प्रश्न-उत्तरामध्ये महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. याबाबत दिलेल्या उत्तरामध्ये वरील माहिती समोर आली. महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यानिकेत, क्रीडा निकेतन, संगीत विद्यालय, आरोग्य शिक्षण, अध्ययन कौशल्य, ध्यानधारणा, योगासने, मॉडेल स्कूल आदी विविध प्रकल्प सुरू आहेत. परंतु, यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच उपलब्ध नसल्याने अनेक उपक्रम केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरामध्ये महापालिकेच्या एकूण २७९ शाळाअसून, विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ९३ हजार १९७ ऐवढी आहे. खासगी शाळांमधील प्रचंड महागड्या शिक्षणामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना महापालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु शिक्षकांची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता यामुळे सध्या महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळा