शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पत्र्याच्या शेडमध्येच भरतात शाळा

By admin | Updated: December 18, 2014 04:31 IST

विद्येचे माहेरघर, ‘हायटेक शहर’ अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आजही अनेक शाळा चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहेत

राहुल शिंदे, पुणेविद्येचे माहेरघर, ‘हायटेक शहर’ अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आजही अनेक शाळा चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहेत. त्यात केवळ पुणे महानगरपालिकेच्या शाळांचा नाही, तर खासगी इंग्रजी माध्यामाच्या केजीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळांचा समावेश आहे. परंतु, यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) अंमलबजावणीला हरताळ फासला जात असल्याने, या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींप्रमाणे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शाळेत शिक्षण मिळायला हवे; परंतु पुणे शहरातील येरवडा, वडगावशेरी, एरंडवणा आणि तळजाई या भागांतील शाळा आजही पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत. एक ई-लर्निंग शाळा सुरू करून, आपण आधुनिक युगाबरोबर चाललो आहोत, असे पालिकेतर्फे अभिमानाने सांगितले जाते. परंतु, पालिकेच्या अनेक शाळांची अवस्था भीषण आहे. मात्र, या शाळांकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.वडगावशेरी येथील ‘नॅशनल चिल्डर्न्स अ‍ॅकॅडमी’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वर्ग सुमारे सात महिन्यांपासून दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत, तर धनकवडी भागातील तळजाई रस्त्यावरील मनपा शाळा क्रमांक-९१ मुलींचे प्राथमिक विद्यालय पूर्णपणे पत्राच्या शेडमध्ये भरत आहे. एवढेच नाही, तर शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एरंडवणा परिसरातील नळस्टॉप जवळील ‘कै. अनुसयाबाई खिलारे प्राथमिक विद्यालय’ या पालिकेच्या शाळेतील काही वर्गसुद्धा पत्र्याच्या शेडमध्येच चालविले जात आहेत. मात्र, सध्या या शाळेजवळ एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. येरवडा परिसरातील हौसिंग बोर्ड येथील ‘समता बालक मंदिर’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्येच शिक्षण घेतले. परंतु, सुदैवाने गेल्या काही महिन्यांपासून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेले हे वर्ग आता बंद केले आहेत.