शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

रुपीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; २५ मुलांना केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 8:13 PM

कुत्र्याचा शोध घेताना महापालिका यंत्रणेची दमछाक झाली असून रात्री उशिरापर्यंत या पिसाळलेल्या कुत्रा सापडलेला नाही.

ठळक मुद्देभटकी कुत्री रात्रीच्या वेळी तर पादचाऱ्यांसंह वाहनचालकांचा पाठलाग करीत असतात. त्याऔषधोपचार करून त्यांना सोडण्यात आले असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे सीएमओ डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सांगितले.

पिंपरी - महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांने रुपीनगरामध्ये धुमाकूळ घातला असून परिसरातील सुमारे २५ मुलांना जमखी केले आहे. त्यामध्ये ६ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. यातील सात जणांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतरांना विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिका यंत्रणेची दमछाक झाली असून रात्री उशिरापर्यंत या पिसाळलेल्या कुत्रा सापडलेला नाही.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्याने चावा घेण्याच्या प्रकारातही तितक्याच दुप्पटीने वाढ होत आहे. शहरासह उपनगरामध्ये कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. भटकी कुत्री रात्रीच्या वेळी तर पादचाऱ्यांसंह वाहनचालकांचा पाठलाग करीत असतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. 

सुट्टीचा दिवस त्यांच्यासाठी दुर्देवीरुपीनगर परिसरत आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. दुपारी दोनच्या सुमारास या पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्याला चावा घ्यायला सुरूवात केली. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लहान - मोठी मुले सुट्टीचा आनंद घेत खेळत होती. या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याला ही लहान मुले बळी पडली. ६ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे  २५ मुलांना या कुत्र्याने चावा घेतला. काही मुले खेळण्यात गुंग होती, तर काही तो खेळ पाहाण्यात रमली होती. हा कुत्री मुलांच्या पाठी लागून चावा घेत होता, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. कुत्र्याचा चावा इतका जोरदार होता की, काही मुलांच्या पोटरीचे लचकेच त्याने तोडले. कित्येक मुलांच्या घरात घुसून या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना कडकडून चावा घेतला.मुलांच्या पालकांनी, आजूबाजूच्या नागरिकांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये मुलांना उपचारासाठी दाखल केले. या प्रकारामुळे लहान मुले घाबरली असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या सात मुलांपैकी चार जणांच्या जखमेवर टाके घालावे लागले आहेत. त्यांच्यासह अन्य मुलांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन, तसेच औषधोपचार करून त्यांना सोडण्यात आले असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे सीएमओ डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सांगितले.

यंत्रणा कमकुवतभटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी उपाययोजना राबविण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा कमकुवत ठरत आहे. एका कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नऊशे रुपये मोजले जातात. उलट मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिकेचा पशवैद्यकीय विभाग केवळ नावापुरताच असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात हा विभाग सक्षम राहिलेला नाही, असा आरोप नागरिकांनी केला.

टॅग्स :dogकुत्राpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका