राजुरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, मारहाण करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:22 IST2023-09-15T16:22:07+5:302023-09-15T16:22:42+5:30

यामध्ये सुनील औटी यांचे घरातून सोन्याची अंगठी, दागिने, बांगड्या, पट्ट्या वेलजोड असा दीड ते दोन तोळे माल चोरीला गेला...

Scam of thieves in Rajuri; Two houses were robbed, beaten and robbed | राजुरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, मारहाण करून लुटले

राजुरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, मारहाण करून लुटले

राजुरी : जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे गेल्या काही दिवसांत चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातच आता गावातील लवन मळ्यातील फॉरेस्टच्या कडेलाच राहाणारे सुनील संतू औटी व तुकाराम सीताराम औटी यांच्या घरात गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांनी घुसून चोरी केली तसेच घरातील लोकांना मारहाण करण्यात आली.

यामध्ये सुनील औटी यांचे घरातून सोन्याची अंगठी, दागिने, बांगड्या, पट्ट्या वेलजोड असा दीड ते दोन तोळे माल चोरीला गेला. तसेच तुकाराम औटी यांच्या घरातूनदेखील सोन्याचे मंगळसूत्र चैन असा तीन ते चार तोळ्याचे दागिने चोरीला गेले. चोरांची संख्या चार ते पाचपर्यंत असल्याचे औटी यांनी सांगितले. घटनास्थळी आळे फाटा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Scam of thieves in Rajuri; Two houses were robbed, beaten and robbed