शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास आजपासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:17 IST

71st Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: येत्या रविवारपर्यंत (दि. १५) हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची सुरुवात वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे.

पुणे : सूर, लय आणि ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ‘स्वरयज्ञा’स बुधवारपासून (दि. १०) दिमाखात प्रारंभ होणार आहे. ७१ व्या महोत्सवात दिग्गज, ज्येष्ठ कलाकारांसह नवोदित, ताकदीच्या कलाकारांच्या कलाविष्काराचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे होणाऱ्या या स्वरयज्ञाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारपर्यंत (दि. १५) हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची सुरुवात वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे.

महोत्सवाची सुरुवात दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या सनईवादनाने होईल. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका आणि पं. प्रभा अत्रे यांच्या शिष्या डॉ. चेतना पाठक आपली गायन सेवा सादर करतील. बनारस घराण्याचे प्रतिनिधी रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायनाचा श्रवणीय आनंद घेता येणार आहे.

भारत­रत्न पं. रविशंकर यांचे शिष्य पं. शुभेंदू राव आणि नेदरलॅण्ड्समधून भारतीय संगीतात साधना केलेल्या विदुषी सास्किया राव देऱ्हास यांचे सतार–चेलो सहवादन विशेष आकर्षण ठरणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या दरवर्षीप्रमाणे बहुप्रतीक्षित गायनाने होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी सुमारे ८ ते १० हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली आहे.

एलईडी स्क्रीन्स आणि कलाकारांचा आवाज शेवटच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यांसोबतच अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत अशी प्रसाधनगृहे मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएलतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sawai Gandharva Bhimsen Festival Commences Today with Musical Extravaganza

Web Summary : Pune's Sawai Gandharva Bhimsen Festival begins today, featuring renowned and emerging artists. The six-day event includes Hindustani classical music performances, tributes, and modern facilities for attendees, promising a rich cultural experience.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेNatakनाटकMarathi Actorमराठी अभिनेता