शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय : रविवारी सुद्धा विद्यार्थ्यांच्या परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:01 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली असून त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ मार्चपासून घेतल्या जाणार होत्या. मात्र, एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने विद्यापीठावर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. आता विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले जाणार आहे. मात्र, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ७० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत.

प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत आवश्यक ती सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेल द्वारे अवगत करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेच यापूर्वी सोडवलेली उत्तरेही सेव्ह होऊन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाईल. साधारणपणे ७ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल.-----विद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.त्यात 50 गुणांच्या प्रश्नांसाठी 60 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

ज्या महाविद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर ,ऑनलाइन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दिनांक 10 एप्रिलपर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फक्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील. तसेच गुणपत्रके मार्च /एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे निकालाबरोबरच एकत्रित वितरित करण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी