सावित्री महोत्सव आजपासून

By Admin | Updated: February 5, 2015 00:21 IST2015-02-05T00:21:28+5:302015-02-05T00:21:28+5:30

अस्सल गावरान उत्पादनांचा पुणेकरांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या सावित्री महोत्सवात स्वाद घेता येणार आहे.

Savitri Mahotsav from today | सावित्री महोत्सव आजपासून

सावित्री महोत्सव आजपासून

पुणे : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान उत्पादनांचा पुणेकरांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या सावित्री महोत्सवात स्वाद घेता येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे या महोत्सवाला गुरुवार (दि. ५)पासून सुरुवात होत असून, ९ फेबु्रवारीपर्यंत तो सुरू राहील.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, बचत गटातील महिला उद्योजकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे व उत्पादक ते ग्राहक यांची थेट सांगड घालणे या प्रमुख उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार दर वर्षी जिल्हास्तरावर अशा प्रकारे बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात सुमारे ८० बचत गट सहभागी होणार असून, विविध उत्पादनांचे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. यांतील २० स्टॉल खाद्यपदार्थांसाठी असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Savitri Mahotsav from today