शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

यूट्यूब चॅनेलमधून उलगडणार ‘सवाई ’ चे अंतरंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 4:14 PM

युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

ठळक मुद्दे युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती, संवादात्मक कार्यक्रम विभागणी शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये या टयूब चॅनेलचे अनावरण होणारकलाकारांचे आठ-नऊ मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करण्यात येणार

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या माध्यमातून गेली अनेक सांस्कृतिकनगरीमध्ये सप्तसुरांची मनसोक्त उधळण होत असते. सूर, ताल आणि लय यांचा अनोखा संगम महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. आजवर अनेक दिग्गजांचा कलाप्रवास या स्वरमंचावर उलगडला आहे. हाच कलाप्रवास युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संकलित करण्यात आला आहे. भीमसेनी स्टुडिओज हे यू-ट्यूब चॅनेल लवकरच सुरू करण्यात येत आहे. कलाकारांच्या सांगीतिक गप्पा या चॅनेलवर पहावयास मिळणार आहेत. महोत्सवात शनिवारी या चॅनेलचे उदघाटन होणार आहे.    भारतीय संस्कृतीला शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक घराण्यांनी अभिजात संगीताच्या परंपरेचा वारसा वृद्धिंगत केला. कलाकारांनी हा वारसा समर्थपणे पेलला. भारतातील नामवंत कलाकारांची गायकी, वादन उलगडणारे अनेक व्हिडीओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कलेचा रसिकांना आस्वाद घेता येतो. मात्र, कलाकारांची तपश्चर्या, संगीतसेवा, जडणघडणीचा प्रवास संगीत रसिकंपर्यंत फारसा पोचत नाही. हा प्रवास सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने युट्युब चॅनेलची संकल्पना साकारली जात आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदा ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाअंतर्गत भारतभरातील दिगग्ज आणि ख्यातनाम, कलाकार आपली कला सादर करतात. कलाकाराची जडणघडण, कलेची जुळलेली नाळ, गुरुंची शिकवण, घराण्याची परंपरा, तरुणाईमधील संगीताची आवड अशा विविध विषयांचे पदर यादरम्यान उलगडले जाणार आहेत. या सर्व मुलाखती युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून रसिकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. महोत्सवात येणाऱ्या कलाकारांचे आठ-नऊ मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करण्यात येणार आहेत.    ते म्हणाले, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती, तसेच संवादात्मक कार्यक्रम आदींची ३५-४० एपिसोडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. एका क्लिकवर या मुलाखती पाहता येऊ शकतील. शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये या टयूब चॅनेलचे अनावरण होणार आहे. 

टॅग्स :artकलाmusicसंगीतYouTubeयु ट्यूबNatakनाटक