शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

शनिवार आणि रविवार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाच नंतर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 9:50 PM

भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.

लोणावळा : भुशी धरण व लायन्स पॉईट परिसरात शनिवार रविवार तसेच सलग सुट्टयांच्या काळात होणारी पर्यटकांची गर्दी व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.भुशी धरण व लायन्स पॉइंट या ठिकाणी वर्षाविहाराकरिता शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने या मार्गावर सुमारे पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तसेच या परिसरात पायी येणार्‍या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने रस्त्यावरून चालणे देखील मुश्कील होत आहे.पर्यटकांच्या सुरक्षेकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह भुशी धरण व लायन्स पॉइंट यासह भाजे, लोहगड, गिधाड तलाव ही सर्व पर्यटनस्थळे सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना बंद केली जाणार आहे. अवजड वाहनांना यामध्ये ट्रक, टेम्पो, बस, मिनी बस यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवसात शहरात प्रवेश बंद असणार आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, महिलांची छेडछाड करणे, अश्लील शेरेबाजी करणे सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणे, धांगडधिंगा घालणे, दारू प्राशन करणे, हुक्का ओढणे असे प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे शिवथरे यांनी सांगितले. पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्तासह साध्या वेशातील पोलीस देखील नेमण्यात आले असून ते या हुल्लडबाजांवर कारवाई करणार आहेत.

टॅग्स :Puneपुणे