शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satish Wagh Case : पतीच्या खुनाचा आरोपाप्रकरणी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 20:23 IST

मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्हयाचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे?

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनाचा कट पत्नी मोहिनी वाघ हिनेच घरात रचल्याचे समोर आले आहे. ही घटना पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आहे. मोहिनी वाघ हिने सुपारी ठरलेल्या रकमेपैकी अक्षय जावळकर याला किती रक्कम दिलेली आहे? ती कशाप्रकारे दिली आहे? सतीश वाघ यांना मारण्याचा नक्की कोणता उद्देश होता? नक्की आर्थिक की अनैतिक कारण आहे याचा तपास करायचा आहे, असे सांगून सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी मोहिनी वाघ हिला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली, त्यानुसार वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी आरोपी मोहिनी वाघ हिला दि. ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.अनैतिक संबंधासह पतीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच ताब्यात असावा, या उद्देशाने ५ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेतील मास्टरमाइंड बायकोच असून, तिने प्रियकराच्या मदतीने मारेकऱ्यांना ५ लाख रुपये देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे समोर आल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघ हिला बुधवारी अटक केली आणि तिला गुरुवारी वानवडी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी अटक केलेले पवन शामसुंदर शर्मा , नवनाथ गुरसाळे, विकास उर्फ विक्की सीताराम शिंदे आणि अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर या चार आरोपींची पोलीस कोठडी अबाधित ठेवून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. पोलिसांनी चारही आरोपींचा प्रॉडक्शन वॉरंट घेऊन त्यांना कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्हयाचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? याबाबत आरोपींकडे समारोसमोर प्रत्यक्ष तपास करायचा आहे असे सरकारी वकील कस्तुरे यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार मोहिनी वाघ सह पाचही आरोपींना न्यायालयाने दि. ३० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयadvocateवकिल