Kidney Racket In Pune: पुण्यातील ससूनला आठवड्याभरात मिळणार नवीन अधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 21:38 IST2022-04-27T21:37:58+5:302022-04-27T21:38:07+5:30

नव्या अधीक्षकांची नियुक्ती पुढील आठवड्यात केली जाणार

Sassoon from Pune will get a new superintendent within a week | Kidney Racket In Pune: पुण्यातील ससूनला आठवड्याभरात मिळणार नवीन अधीक्षक

Kidney Racket In Pune: पुण्यातील ससूनला आठवड्याभरात मिळणार नवीन अधीक्षक

पुणे : किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात चौकशी समितीने अवयव प्रत्यारोपण समितीला स्थगिती दिली होती. त्यानंतर अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. ससून सर्वोपचार रुग्णालयात आता नव्या अधीक्षकांची नियुक्ती पुढील आठवड्यात केली जाणार आहे.

नवीन अधीक्षक नियुक्त करण्याचे अधिकारही वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वत: कडे राखीव ठेवले होते. ससूनच्या अधिष्ठाता यांनी नवीन अधीक्षक पदासाठी पात्र असलेल्यांची नावे पाठवा, असे सांगण्यात आले होते. विभागाकडूनच नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार नवीन वैैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती आठवड्याभरात केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले. ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने अधीक्षक पदासाठी पाच प्राध्यापकांची नावे  पाठवली आहेत. वरिष्ठ स्तरावरूनच ही नियुक्ती होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दिली.  

Web Title: Sassoon from Pune will get a new superintendent within a week