पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीचा अनेक डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्रित येत निषेध केला. तसेच त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे बदली रद्दची मागणीही केली. दैनंदिन काम बंद न ठेवता निषेध म्हणून अनेकांनी काळ्या फिती लावून काम केले.डॉ. चंदनवाले यांची गुरूवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर रुग्णालयातील अनेकांना धक्का बसला. ससूनमधील नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. यापार्श्वभुमीवर ही बदली झाल्याने रुग्णालयातील काहींनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी पदभार सोडून जाताना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (मार्ड)चे काही सदस्य, काही वरिष्ठ डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर एकत्रित जमा झाले होते. यावेळी त्यांनी चंदनवाले सरांना पदभार सोडून न जाण्याची विनंती केली. तसेच बदलीचा निषेधही नोंदविला. पण चंदनवाले यांनी सर्वांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले.डॉ. चंदनवाले यांची बदली रद्द करण्याची मागणी करणारे सुमारे १२५ जणांच्या सह्यांचे पत्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांना पाठविण्यात आले. तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन त्यांनाही मागणीचे निवेदन दिले. डॉ. चंदनवाले यांची अचानक बदली झाल्याने अनेकांचे मनोबल खचले आहे. सद्यस्थितीत नवीन व्यक्तीकडून नियोजन, व्यवस्थापन सुरू झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करायला हवी, असे मार्ड डॉक्टरांनी सांगितले.-------------अधिष्ठातापदी डॉ. शिंत्रेडॉ. चंदनवाले यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे अधिष्ठाता पदाची सुत्रे सोपविली. त्यानंतर ते वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या मुंबईतील कार्यालयाकडे रवाना झाले. रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने डॉ. शिंत्रे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:04 IST
ससून रुग्णालयातील गेल्या काही दिवसातील चढता आलेख बदलीस कारणीभूत असल्याची चर्चा
डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध
ठळक मुद्देदैनंदिन काम बंद न ठेवता निषेध म्हणून अनेकांनी काळ्या फिती लावून काम डॉ. चंदनवाले यांची गुरूवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर रुग्णालयातील अनेकांना धक्का