शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्याचे काम रखडल्याने सरपंचाचे अर्धनग्न आंदोलन;ठिय्या मांडत दिला उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:14 IST

वादग्रस्त ५० मीटरची जागा आहे ती जागा सोडून काम करण्याची सूचना करूनही ठेकेदाराने काहीच केले नाही.

मंचर : पिंपळगाव खडकी गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीट काम रखडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी गावचे सरपंच दीपक पोखरकर यांनी चक्क कपडे काढून अर्धनग्न होत रस्त्यावर आंदोलन केले. रस्त्यावरच ठिय्या मांडला.सदर काम चालू झाले नाही तर उपोषण करण्याचा इशारा सरपंच पोखरकर यांनी दिला आहे. तुकानांना चौक ते पिंपळगाव खडकी इतर जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत.अंदाजपत्रक तयार होऊन बाकीच्या परवानगी होऊन रस्त्याचं काम चालू झालं असून रस्ता कॉक्रिटीकरणाचा होणार आहे. त्याच्यानंतर रस्त्याला गावात चढ होता तो कमी केला जाणार आहे, त्यामुळे जवळजवळ आठ फुटाचे खोदकाम एक किलोमीटरच्या पॅसेजमध्ये करण्यात आले.रस्त्यातील संपूर्ण माती मोकळी झाली. एक-दोन नागरिकांनी हरकती घेतल्यामुळे काम बंद झाले आहे. संबंधित नागरिकांवर शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतने पत्र पोलिस स्टेशनला दिले. परंतु पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणं असं आलं की, हा रस्ता इतर जिल्हा मार्ग म्हणजे जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही कुठलीही हालचाल झाली नाहीपरिणामी गेली एक-दीड महिन्यापासून काम बंद आहे. रस्त्यावर माती तयार झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ आणि फुफाटा तयार झाला आहे. दिवसभर धुळीचा साम्राज्य असल्याने लोकांना अक्षरशः श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. थंडीचे दिवस असल्याने चौकामध्ये लोक उभे राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. संबंधित ठेकेदाराला पाणी मारण्यास सांगितले तर तो उडवाउडवीची उत्तर देतो.वादग्रस्त ५० मीटरची जागा आहे ती जागा सोडून काम करण्याची सूचना करूनही ठेकेदाराने काहीच केले नाही. त्यामुळे संतप्त झालेले सरपंच दीपक पोखरकर यांनी सकाळी कडाक्याच्या थंडीत कपडे उतरवून आंदोलन केले. या अर्धनग्न आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. काम लवकर चालू झाले नाही तर उपोषण करण्याचे निवेदन सरपंच पोखरकर यांनी प्रशासनाला दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsarpanchसरपंचroad transportरस्ते वाहतूकcivic issueनागरी समस्या