शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

संत तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:06 PM

पंढरीची ओढ लागलेल्या वैष्णवांनी पुणे जिल्ह्यातील २२२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ लागली आहे.

ठळक मुद्देसराटीत पादुकांना नीरास्नान करून पुणे जिल्ह्यातून निरोपनीरा नदीवरील पुणे-सोलापूर पूल ओलांडून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे प्रस्थान आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ

बावडा : पंढरीसी जाय, तो विसरे मायबाप! अवघा होय पांडुरंग, राहू धरोनिया अंग! न लगे धनमान, देहभावे उदासीन! तुका म्हणे मळ, नाशितत्काळते स्थळ! या अभंगाप्रमाणे पंढरीची ओढ लागलेल्या वैष्णवांनी पुणे जिल्ह्यातील २२२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ लागली आहे.तत्पूर्वी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पादुकांना सकाळी सराटी तालुका इंदापूर येथे नीरा नदीमध्ये उत्साहात स्नान घालण्यात आले.काल सायंकाळी वैष्णवांचा मेळा पालखीसह पुणे जिल्ह्यातील सराटी गावी मुक्कामासाठी थांबला. गाव व परिसरातील भाविकांनी या ठिकाणी संत तुकारामांच्या पादुकांचे दर्शन घेतले. रात्री या ठिकाणी कीर्तन, भारुड अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सराटीनगरी दुमदुमून गेली होती.आज सकाळी सात वाजता सनईच्या सुरात पालखी स्नानासाठी नीरा नदीमध्ये नेण्यात आली. त्यावेळी शिंगटाच्या ललकारीने आसमंत दुमदुमला. त्या ठिकाणी पांडुरंगाची आरती घेऊन तुकोबांच्या पादुकांना भावपूर्वक स्नान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता सराटी येथून पालखीने सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान केले.पालखी प्रस्थानावेळी गावचे प्रमुख नेते आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, हनुमंतराव कोकाटे, सरपंच बापू कोकाटे, उपसरपंच सचिन कोकाटे, ग्रामसेवक हनुमंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पुणे जिल्ह्यातून अखेरचा निरोप दिला. त्यानंतर नीरा नदीवरील पुणे-सोलापूर पूल ओलांडून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे प्रस्थान केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीताई मोहिते-पाटील आदींनी पालखीचे पुणे-सोलापूर सीमेवर स्वागत केले. 

टॅग्स :IndapurइंदापूरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा