शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:35 IST

Ashadhi Wari- वैष्णवांच्या सोहळ्यात वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

वानवडी : श्रीमंत सरदार महादजी शिंदेचा वारसा लाभलेल्या व वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखींचे (Sant Tukaram Maharaj palkhi) श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पावनभुमीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. (Ashadhi Wari)

वानवडीत भैरोबानाला चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे सकाळी ७.३० वा आगमन झाले. माऊलींच्या पालखी मध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेच्या पादुका ठेवून परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली. आरती सुरु होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय  आरतीसाठी सज्ज झाला. आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, ह.भ.प.श्री. बाळासाहेब गव्हाणे व श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी असलेल्या सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. आरती होऊन माऊलींची पालखी   हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी, भैरोबानाला येथे सकाळी ९.१५ वा. आगमन झाले. वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे आरती घेण्यात आली व वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी भजन व ग्यानबा तुकाराम मुखी ठेवून हडपसरच्या दिशेने मार्गस्थ  झाली. या पालीखीसोहळ्यात वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुरुवातीला पालख्या जात होत्या श्रीमंत सरदार महादजी शिंदे छत्री मार्गे...

आळंदी ते पंढरपूर पर्यंत असणाऱ्या वारी सोहळ्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. वानवडी मध्ये महादजी शिंदे महाराज यांची समाधी असून सुरुवातीला पालख्या खांद्यावर घेऊन यांची समाधी असलेल्या व शिंदे छत्री म्हणुन नावारुपाला आलेल्या मंदिराकडे आरती होऊन पुढे मार्गस्थ होत होत्या. परंतु कालांतराने वारी सोहळ्यातील वैष्णवांचा जनसमुदाय वाढत गेला व गावातील रस्ते लहान पडत गेले आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी रथात ठेवून भैरोबानाला मार्गे हडपसर च्या दिशेने पंढरपूरला जाण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरWanvadiवानवडीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर