शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:25 PM

'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

ठळक मुद्देफडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात वारकरी तल्लीनउद्या चांदोबाबा लिंब येथे पाहिले रिंगण होणार

- अमोल अवचिते-  

लोणंद : सत्यगुराये कृपा मज केली !             परी नाही घडली सेवा कांही!             सांपडविले वाटे जाता गंगास्नाना!             मस्तकी तो जाणा ठेविला कर ! 'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी हजारो संख्येने वैष्णवजनांनी गर्दी केली होती. नीरा येथे विसावा घेऊन शाही स्नानानंतर मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे स्वागत झाले.     वाल्ह्याच्या मुक्कामा नंतर सकाळी माऊलींची पालखी पिंपरे खुर्द विहिरी येथे विसावा घेऊन नीरा नदीच्या तिरावर विसाव्याला अकरा वाजता पोहचली. दुपारी दोन वाजता माऊलींच्या जयघोषात शाही स्नान घालण्यात आले. पालखी संध्याकाळी सातच्या सुमारास  लोणंद येथे विसावली.      दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नानाच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पादुकांना दत्त घाटावर आणताच फुलांचा वर्षाव करण्यात आला.  नीरातीरावर शंखनाद सुरू झाला. 

फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता.      पोलिस आणि एनएसएसच्या स्वयंमसेवकांनी गर्दी व्यवस्थापन केले. सुरक्षिततेसाठी दोन ड्रोन कॅमेऱ्याने टेहळणी केली जात होती. नदी तीरावर वारकऱ्यांनी स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच घाटावर भजन सुरू होते. वारकरी दुपारी जेवण नदी तीरावर करीत होते. स्थानिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.         सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी व्यवस्था केली होती.
दत्त घाटावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. महाबळेश्वर ट्रेकर्स कडून नीरा नदीत सुरक्षिततेसाठी बोट ठेवण्यात आली होती.  ...................   कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणंद नगरीत पालखीचे स्वागत करण्यात आले. लोणंद नगरीच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी बुधवारी (आज) दुपारी एक नंतर निघणार असून बुधवारी (उद्या ) चांदोबाबा लिंब येथे पाहिले रिंगण होणार आहे. त्यानंतर तरडगाव येथे  मुक्कामी असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी