शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:43 IST

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी पहाटे तीनपासून सुरू होणार

आळंदी : उभारिला ध्वज तीही लोकांवरती !             ऐसा चराचरी कीर्ती ज्यांची !!             ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान !             मुक्ताबाई ज्ञानदीप्तीकळा !!संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त रविवारी (दि. १०) ‘माउली - माउली’च्या जयघोषात ‘श्रीं’ची वैभवी ‘रथोत्सव’ मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखों भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली होती. सोमवारी (दि. ११) माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.

तत्पूर्वी, पहाटे माउलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून अडीचच्या सुमारास प्रांताधिकारी कट्यारे यांच्या हस्ते शासकीय पंचोपचार पूजा पार पडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माउलींची विधिवत पूजा करून माउलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगीबेरंगी आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविलेले ‘श्रीं’चे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. टाळ- मृदंगांचा निनाद आणि ‘माउली-तुकोबां’च्या' जयघोषात रथोत्सव मिरवणूक फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराेबा चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली.

धुपारतीनंतर मंदिरातील गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांचा देवस्थानच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. महानैवेद्य, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी द्वादशीचा दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, दुपारी चार वाजता वीणा मंडपात ह.भ.प. हरिभाऊ महाराज बडवे यांचे हरिकीर्तन झाले. तर संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला केंदूर (ता. शिरूर) येथील संतश्रेष्ठ श्री कान्होराज महाराजांनी मंदिरात कीर्तन केले होते. त्यांची प्रथा व परंपरा आजही केंदुरकरांकडून जपली जात आहे. रात्री नऊ ते अकरा यावेळेत वीणा मंडपात केंदुरकरांच्या वतीने कीर्तन झाले. रात्री उशिरा नारळ - प्रसाद वाटून द्वादशीची सांगता करण्यात आली.

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी (दि. ११) पहाटे तीनपासून सुरू होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य त्रयोदशीला अलंकापुरीत समाधी घेतली होती. मंगळवारी त्याला ७२७ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त ‘श्रीं’च्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, माउलींच्या मंदिरात घंटानाद, सोहळ्यावर आधारित वीणा मंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराजांचे कीर्तन होईल.

* रात्री १२ पासून संजीवन समाधीच्या दिवसाला प्रारंभ.* पहाटे ३ ते ४ विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती.* सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन.* ७.३० ते ९.३० वीणामंडपात कीर्तन.* सकाळी १० ते दुपारी १२ संजीवन समाधी सोहळ्यावर ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन.* सकाळी १० ते दुपारी १२ महाद्वारात काल्याचे कीर्तन नंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा.* दुपारी १२ ते साडेबारा ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी व आरती, नारळ व प्रसाद.* दुपारी १२:३० ते १ महानैवद्य.* सायंकाळी ६:३० ते ८:३० वीणा मंडपात सोपानकाका देहूकर यांचे कीर्तन.* रात्री ९.३० ते ११:३० कारंजा मंडपात भजन.* रात्री १२ ते ४ हैबतरावबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीSocialसामाजिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरTempleमंदिर