शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संजय काकडे यांचे पंकजा मुंडेंबद्दलचे वक्तव्य वैयक्तिक ; भाजपने हात झटकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 17:38 IST

आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले. 

पुणे : राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपमध्ये चांगलाच गदारोळ उडाला आहे. अखेर शहराध्यक्षा माधुरी मिसळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ते काकडे यांचे वैयक्तिक मत असून पक्षाशी त्याचा काहीही संबंध संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले. 

मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर सभा घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावर अजून तरी पक्षातल्या कोणत्याही प्रमुखाने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.काकडे यांनी 'मुंडे या स्वतःच त्यांच्या पराभवाला करणीभूत असून त्यांनी इतरांवर खापर फोडू नये, पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता, तेव्हा तुम्हाला काही काम करता आली नाही तर महाराष्ट्रात काय तुम्ही फिरणार' अशा शब्दात टीका केली होती. 

त्या टीकेने आता पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना मिसाळ म्हणाल्या की,' गेल्या २-३ दिवसांमध्ये बऱ्याच शक्ती दिसताहेत की ज्यांना भाजपमध्ये फूट पाडायची आहे. त्यांचा पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. निषेध करण्याइतकं या वक्तव्याला महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. भाजपच्या कोणत्याही नेत्याचे हे म्हणणे नाही. पंकजा या आमच्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे नेतृत्व आहे. गेली पाच वर्ष त्या पक्षासाठी काम करत आहे, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते '. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाSanjay Kakdeसंजय काकडेPoliticsराजकारणparli-acपरळीMadhuri Misalमाधुरी मिसाळ