शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?
2
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"
3
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
4
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
5
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
6
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
7
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
8
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
9
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
10
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
11
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
12
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
13
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
14
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
15
NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी
16
नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन
17
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली
18
NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...
19
“NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी
20
Railway PSU ला Tata Group कडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्स वधारले; १ वर्षात ७०% रिटर्न

तीन वर्षांपासून फरार असलेल्या वाळू माफियाला अकलूज येथे अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:16 PM

महसूल विभागाने जप्त केलेले वाळूचे दोन ट्रक दरोडा टाकून पळवून नेले होते पळवून..

लोणी काळभोर : महसूल विभागाने जप्त केलेले वाळूचे दोन ट्रक दरोडा टाकून पळवून नेल्याप्रकरणी तीन वर्षापासून फरारी असलेल्या वाळूमाफियाला   अकलूज ( जि.सोलापूर ) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. 

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रमेश दगडू शिंदे ( वय ३४, रा. पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) याला अटक करण्यात आली आहे. १३ मार्च २०१७ रोजी ५ वाजण्याच्या सुमारांस यवत ( ता. दौंड ) येथील शासकीय विश्रामगृहाचे परीसरात सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी शहाजी मारूती भंडलकर ( रा.खामगाव ता.दौंड ) व काळुराम जगन्नाथ शेवाळे ( रा. यवत ता.दौंड ) हे तहसिलदार यांनी चोरटी वाळु वाहतुक कारवाई करून जप्त केलेल्या २१ वाहनावर देखरेखीचे शासकीय कामकाज करीत होते. 

   याठिकाणी रमेश शिंदे यांच्यासमवेत राजकुमार संपत पवार ( वय २७,  रा. गार अकोले, ता.माढा, जि.सोलापुर ), अमोल दत्तात्रय माकर ( वय २७,  रा. गोकळी, ता.इंदापुर ), कृष्णा श्रीनिवास पाटील ( वय २४, रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर ) व इतर दोघे यांनी संगनमत करून ट्रक चोरून नेण्याचे उद्देशाने शासकीय विश्रामगृहामध्ये आले व त्यांनी भंडलकर व शेवाळे यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शेवाळे यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत महसुल विभागाने जप्त केलेले १०,००,०००/- रू किमतीचे प्रत्येकी तीन ब्रास वाळुसह भरलेले दोन ट्रक नंबर एमएच.१२ एफझेड ४९५५  व एमएच १३ एएक्स ४५३८ हे वाळूसह शासकीय कामात अडथळा आणून दरोडा टाकुन पळवून नेले होते. त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून वाळू माफियांविरुद्ध दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये यापूर्वी पवार, माकर व पाटील या तीन जणांना अटक करण्यात आलेली होती.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडणेकामी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहिम राबवित असताना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले यांचे पथकास २२ डिसेंबर रोजी सदर दरोडयाच्या गुन्हयातील तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी रमेश शिंदे हा बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्यावरून पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अकलूज (जि.सोलापूर) येथून तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे. पुढील कारवाईसाठी त्यास यवत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरsandवाळूPoliceपोलिसArrestअटक