शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थ्याकडून " पीएमपी " च्या बनावट पासची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:22 IST

पीएमपी कडून विद्यार्थ्यांना ७५० रुपयांचा सवलतीच्या दरातील मासिक पास वितरीत केला जातो..

ठळक मुद्देविद्यार्थ्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन विद्यार्थ्याकडून बनावट मासिक पास तयार करून विद्यार्थ्यांना विक्री केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाहकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर विद्यार्थ्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक केली आहे.पीएमपी कडून विद्यार्थ्यांना ७५० रुपयांचा सवलतीच्या दरातील मासिक पास वितरीत केला जातो. हा पास पीएमपीच्या सर्व पास केंद्रांसह प्रमुख बसस्थानकांवर उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे ओळखपत्रासह अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना पास वितरीत केले जातात. काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन आगारातील पीएमपीचे वाहक अमित सैताने हे स्वारगेट ते पुणे स्टेशन या मार्गावर कार्यरत असताना त्यांना एका विद्यार्थ्याकडे बनावट पास असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा पास एका अल्पवयीन विद्यार्थ्याने ६५० रुपये घेऊन दिल्याचे त्याने सांगितले. यानंतर मुख्य वाहतुक निरीक्षक कुसाळकर व इतर कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी सापळा रचून संबंधित विद्याथ्यार्ला बनावट पास विकताना रंगेहाथ पकडले. संबंधित विद्यार्थी वडगाव शेरी येथे राहणारा असून त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आणखी किती बनावट पास तयार करून दिले, याचा तपास केला जात आहे. यापुवीर्ही बनावट पास सापडण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच पासवर खाडाखोड करून तारखा बदलण्याचे प्रकारही सातत्याने उघडकीस आले आहेत. यापुढील काळात असे प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.-------------

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी