शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पगार गलेलठ्ठ, पण नोकरीची शाश्वती नसल्याने आयटीयन्स त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 04:09 IST

फोरम फॉर आयटी एम्प्लोयी या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अचानक कामावरून काढलेल्या १०० पेक्षा अधिक आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालय आणि कामगार न्यायालयात धाव घेत आम्हाला नोकरीवरून का काढले, असा सवाल कंपन्यांना केला आहे.

- सनील गाडेकर पुणे : जॉब असावा तर आयटीमध्ये... भरपूर पगार...शनिवार-रविवार सुटी...वर्ककल्चर पण भारी.. इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचे आणि नागरिकांचे आयटी फिल्डबाबत जवळपास असेच मत आहे. यात बºयाच अंशी तथ्य असले, तरी व गलेगठ्ठ पगार असला, तरी या क्षेत्रात नोकरीची शाश्वती मिळत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.कॉस्टकटिंग करायची असल्याने परफॉर्मन्स चांगला नसल्याचे कारण देत कर्मचाºयांना नोकरीवरून काढून टाकण्याचे प्रकार या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. फोरम फॉर आयटी एम्प्लोयी या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अचानक कामावरून काढलेल्या १०० पेक्षा अधिक आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालय आणि कामगार न्यायालयात धाव घेत आम्हाला नोकरीवरून का काढले, असा सवाल कंपन्यांना केला आहे. अचानक कामावरून कमी केलेले कर्मचारी सुरुवातील कामगार आयुक्तालयात आपली कैफियत मांडत आहे. कामगार आयुक्त अशा प्रकरणात चर्चा करून मार्ग काढू शकतात. त्यातील बोनस, पेन्शन, वैद्यकीय खर्चाबाबतचे प्रकरणे या ठिकाणी मिटत आहेत; मात्र नोकरीवरून काढल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारी शक्यतो न्यायालयात जात आहेत, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.अचानक आलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे हतबल झालेला तरुण कमी पगार का असेना; पण एखाद्या छोट्यामोठ्या कंपनीत रुजू होत आहेत. संबंधित कर्मचारी जेव्हा नोकरीसाठी नवीन कंपनीत जातो, तेव्हा त्यांना वाटते की याला परफॉर्मन्समुळे काढले असेल. कर्मचाºयांना अनेक महिने बेरोजगारीचा सामाना करावा लागत आहे. काहींना तर स्वत:चे केक शॉप किंवा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी कॅब चालवणे पसंत केले आहे. कोणत्याही कर्मचाºयाला कामावरून काढताना किमान ६ महिने नोटीस दिली जावी; तसेच कमी करण्याचे योग्य कारण असलेले पत्र मिळावे. या दोन्ही गोष्टींमुळे पुढील नोकरी मिळणे अधीक सोयीस्कर होईल; तसेच चांगल्या मुलांच्या करिअरचे नुकसानही होणार नाही, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. आयटीमधील २० टक्के कर्मचारी हे केपीओ व बीपीओमध्ये (कॉल सेंटर) काम करणारे आहेत. १० ते १२ तास काम करूनही त्यांना केवळ १२ ते १६ हजार रुपये पगार दिला जातो. किमान वेतन आयोगाचे कोणतेही नियम नाहीत.कमिटीची स्थापन करावीसध्या पुण्यात ८ ते १० लाख आयटी कर्मचारी आहेत; मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नाही. त्यामुळे आयटी कंपनी व तेथील कर्मचाºयांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने कमिटीची स्थापना करावी. कामावरून काढताना कोणते नियम आहेत, रात्रपाळीला काम करणाºयांना किती भत्ता दिला पाहिजे, कर्मचाºयांचे अधिकार काय आहेत, याबाबत कमिटीने काम करावे अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष पवनजित माने यांनी केली आहे.प्रसूती रजाही ठरतेय धोकादायकसुधारित कामगार कायद्यानुसार महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा देणे आवश्यक आहे; मात्र एखादी महिला कर्मचारी गरोदर असल्याचे समजताच अनेक छोट्या कंपन्या त्यांना थेट कामावरून काढून टाकतात. तिला सहा महिन्यांचा पगार द्यावा लागू नये हे, त्यामागील प्रमुख कारण असते. त्यामुळे प्रसूती रजाही महिला कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानPuneपुणे