शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:08 AM

चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे.

विशाल दरगुडे चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे. प्रत्येक विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वीज वितरण विभाग अग्रेसर आहे. कारण या भागात वीज वितरण विभागाच्या ‘हाय व्होल्टेज’च्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. साईनाथनगर परिसरात सर्वत्र फक्त ताराच तारा दिसतात. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी पूर्वीपासून इमारती आहेत, त्या इमारतींच्या गॅलरीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.वीजखांबामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येतात. या तारा भूमिगत करणे गरजेचे असून,तसे झाल्यास या भागाचा खूपगंभीर अन् धोकादायक प्रश्न मार्गी लागून या भागाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.> मिरवणूक मार्गात अडसरसाईनाथनगर येथून वडगावशेरीतील विविध मिरवणुका साईनाथनगर मुख्य चौकातूनच नदीकाठी जातात. येथून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वडगावशेरी, चंदननगरमधील नागरिकांचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातात काठी घेऊन विजेच्या तारा हटविण्याचे काम करावे लागते.दरवर्षी मिरवणुकीतील चित्ररथामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील अंधारात पडतो. या भागातील भूमिगत वीजतारा करण्याची जुनी मागणी आहे.>दिवसाला येतात तीन ते चार कॉलशहरातील विविध भागांतून विविध घटनांसंदर्भातील तीन ते चार कॉल येतात. वर्षाची ही संख्या हजाराच्या वर आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात आगीचे कॉल अधिक येतात. कॉलच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे.>विजेचा लपंडाव-येथील परिसरातील विजेच्या तारा अगदी खाली असल्याने पतंगाचा मांजा, मोठमोठ्या वाहनांच्या टपाला अडकून तार तुटून अपघात होतात. लहान-मोठा पाऊस पडला तरी विजेचा लपंडाव सुरू होतो. बºयाचदा दिवसभर वीज गायब असते. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होते. हा त्रास नित्याचाच आहे.>राजकीय इच्छाशक्तीची गरज फक्त...साईनाथनगरचा विकास करणे सहज शक्य...साईनाथनगर परिसर वगळता वडगावशेरी असो किंवा खराडीचा भाग असो दोन्हींचा प्रचंड वेगाने विकास झालेला आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी त्यांच्या दोन वर्षांचा विकासनिधी या परिसराच्या विकासासाठी वापरल्यास साईनाथनगरचाही सर्वांगीण विकास दूर नाही... विकास होऊ शकतो फक्त त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज>साईनाथनगरमध्ये राहणे म्हणजे जीव वेशीवर टांगणे.साईनाथनगरमधील पसरलेले विजेच्या तारांचे जाळे हे जणू या परिसरातील नागरिकांचा जीवच वेशीवर टांगल्यासारखे असून, अतिशय धोकादायक परिसरात या भागातील नागरिक वास्तव्यास आहेत.> उघड्यावर तारासाईनाथनगर परिसर व जुना-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर केबल पडल्या असून, त्या विजेच्या खांबाना लटकलेल्या आहेत. त्या रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे धोकादायक आहेत.> वीजतारांचे जाळेसाईनाथनगर चौक व अंतर्गत रस्त्यावरील सर्व साईनाथनगर मधील अंतर्गत भागात वीजखांबांना तारांचे जाळेच जागोजागी पसरलेले पाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे