साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष रेल्वे धावणार;तिरुपतीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:55 IST2025-07-31T10:55:05+5:302025-07-31T10:55:28+5:30
रेल्वेला वाढत्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. याचा फायदा तिरुपतीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार आहे.

साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष रेल्वे धावणार;तिरुपतीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार फायदा
पुणे : रेल्वेला वाढत्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. याचा फायदा तिरुपतीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार आहे.
गाडी क्रमांक ०७६३७ तिरुपती-साईनगर शिर्डी दर रविवारी तिरुपती येथून पहाटे ४.०० वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. ही गाडी ३ ऑगस्ट २८ सप्टेंबरपर्यंत धावेल. दरम्यान या गाडीचे एकूण नऊ फेऱ्या होईल.
तर गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी - तिरुपती ही गाडी साईनगर शिर्डी येथून दर सोमवारी रात्री ०७:३५ वाजता निघेल. बुधवारी रात्री ०१:३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.
या गाडीला रेनिगुंटा, गुडूर जंक्शन, नेल्लोर, ओंगोले, चिराळा, तेनाली जंक्शन, सत्तेनापल्ले, उडीराबाद, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी जंक्शन, सेलू, जालना, नगरसोल, अंकाई, मनमाड जंक्शन, आणि कोपरगाव याठिकाणी थांबे असतील.