शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खाचे आभाळ कोसळूनही डगमगला नाही बाप!

By admin | Updated: June 26, 2015 04:12 IST

एका दुर्दैवी अपघातात आपला काळजाचा तुकडाच गमावून बसलेल्या बापावर दु:खाचा डोंगर कोसळला. काबाडकष्ट करून, प्रसंगी कर्ज काढून एकुलत्या मुलाला

भानुदास पऱ्हाड, शेळपिंपळगावएका दुर्दैवी अपघातात आपला काळजाचा तुकडाच गमावून बसलेल्या बापावर दु:खाचा डोंगर कोसळला. काबाडकष्ट करून, प्रसंगी कर्ज काढून एकुलत्या मुलाला इंजिनियर केले, आता-आता कुठे त्याच्या करियरची सुरुवात झाली़, आणि क्षणार्धात सगळे संपले. समोर काळाकुट्ट अंधार... मात्र या परिस्थितीतही खंबीरपणे उभा राहत ‘अवयव दान’ करून ‘त्यांनी’ मोठा आदर्श घालून दिला आहे.रांजणगाव (ता.शिरूर) येथील रस्ता अपघातात ज्ञानेश्वर सुदाम नवले (वय २२ मूळ रा. नांदगाव, ता. निफाड जि. नाशिक) हा नुकताच इंजिनियर झालेला तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़ अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत होऊन तो निष्क्रिय झाल्याचे निष्पन्न झाले. तरुणाचे वडील व कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी घडला प्रकार त्यांच्या कानी घालून ज्ञानेश्वरच्या अवयवदानाची विनंती केली. आभाळाएवढं दु:ख पदरी पडूनही शेतकरी असलेल्या सुदाम नवले यांनी मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून समाजासाठी काही करण्याचा निर्णय घेतला़ आपला मुलगा गेला, पण त्याच्या हृदयाच्या, डोळ्यांच्या आणि किडनी सारख्या अवयवांच्या रुपाने तो कुणाच्या तरी माध्यमातून जगावा यासाठी अवयव दानाचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वरचा मृतदेह पुण्यातील रुबी हॉलमध्ये आणून सर्व अवयव शास्रीय पद्धतीने काढून घेण्यात आले. सुदाम नवले यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे़ ते शेती करतात़ ज्ञानेश्वरच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षणकर्ज काढले होते़ हाताशी आलेल्या मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे़