शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पुण्यात धावतेय एक ‘भन्नाट’ रिक्षा.. तिच्या निसर्ग संपन्न गारव्याची ‘चर्चा ’दशदिशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 20:47 IST

पुणे हे तसे भन्नाट प्रयोगासाठी नेहंमीच प्रसिध्द राहिले आहे. तसाच एक हटके प्रयोग एका रिक्षात पाहायला मिळाला तर...

- अतुल चिंचली- पुणे: रिक्षातून प्रवास म्हटलं की पुणेकर नागरिकांचा अनुभव चांगला - वाईट असा संमिश्र आहे. त्यात मेट्रोचे काम,वाढती वाहतुकीची समस्या, तसेच आगामी कडक उन्हाळा अशी भयंकर परीक्षा पाहणारा काळ पुणेकरांचा घाम काढल्याशिवाय राहणार नाही. पण यावर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत शांत बसतील ते पुणेकर कसे...? मग सुरु होतो तो सुखाचा प्रवास देणाऱ्या एक ना अनेक साधनांचा शोध.. पुणे हे तसे भन्नाट प्रयोगासाठी नेहंमीच प्रसिध्द राहिले आहे. तसाच एक हटके प्रयोग एका रिक्षात पाहायला मिळाला तर... नक्कीच तुम्हांला सुखाची सफर अनुभवायला मिळाल्याशिवाय राहणार नाही...आर्टिफिशियल गवत, फुले, यांनी व्यापून निसर्ग वाचवा असा संदेश देणारी ही रिक्षा सर्वांची मने जिंकून आनंददायी निसर्ग प्रवासाची अनुभूती देत आहे.  इब्राहिम तांबोळी यांनी आपल्या स्वत:च्या रिक्षाला संपूर्ण आर्टिफिशियल गवत, फुले आणि झाडांची सजावट केली आहे. इब्राहिम तांबोळी हे पुण्यात रविवार पेठेत वास्तव्यास आहेत. गेली एक वर्ष झाले ते रिक्षा व्यवसाय करत आहेत. तांबोळी यांना निसर्गावर अतोनात प्रेम आहे. सध्याच्या जीवन हे तंत्रज्ञान युगाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. प्रत्येक माणूस सद्यस्थितीत डिजिटल होताना दिसून येतो. अशा वेळी मानवाला जागे करण्यासाठी निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देणे गरजेचे आहे. अनेक संस्था, शाळा, माध्यमे, महाविद्यालयीन तरुण - तरुणी निसगार्ची जोपासना करतात. तो वाचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून, जनजागृती करून संदेश देत असतात. पण अशा प्रकारे रिक्षातून कोणीही संदेश दिला नाही.  तांबोळींच्या या रिक्षाला आतून - बाहेरून सर्व बाजूनी सजावट केली आहे. या सजावटीमध्ये निळया, पिवळ्या, आकाशी, लाल, हिरव्या रंगाची आकर्षक फुले लावली आहेत. तर पूर्ण रिक्षाला आर्टिफिशियल गवत लावण्यात आले आहे. तसेच आतील बाजूला वाघ, सिंह, घोडा अशा प्राण्यांचे फोटो बसवण्यात आले आहेत. रिक्षाच्या वरील बाजूस मागे - पुढे एलईडी लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. रिक्षात लहान स्पीकर आहे. त्या स्पीकरमधून जंगलातील प्राणी, पक्ष्यांचा किलबिलाट, खूप चांगल्या प्रकारे ऐकायला मिळतो. तांबोळींच्या या निसर्ग वाचवा हा संदेश देणा?्या रिक्षातून अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. प्रवास करताना आपल्याला ही फुले, पाने व गवत पाहून जंगलातील निसर्गप्रवासाची आठवण होते. तसेच तांबोळी या गवताला सुगंधी अत्तर लावतात. त्यामुळे रिक्षात बसल्यावर नैसर्गिक वातावरण अनुभवता येत आहे. काही तरुणांनी तर लग्नानंतर आम्हाला या रिक्षातून फिरायचे आहे. अशी मागणी तांबोळी यांच्याकडे केली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी यातून प्रवास केला आहे. रिक्षात एकदा माणूस बसला की तो मनातील सर्व विचार बाजूला ठेवतो. या निसर्गरम्य वातावरणात बुडून जातो. तांबोळी म्हणाले, माझ्या घरात अनेक झाडे झुडपे आहेत. आम्ही सुद्धा आधी शेतकरी होतो त्यामुळे आम्हाला निसगार्ची जाण आहे. आपल्या सर्वांचा अन्नदाता हा शेतकरी आहे. शेतक?्यांचे सर्वकाही निसर्गावर अवलंबून असते. पर्यावरनाच्या दृष्टीने झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा हा संदेश समाजात पोहोचवायला पाहिजे. आताच्या तंत्रज्ञान युगात माणूस निसगार्ला विसरत चालला आहे. त्याला माज्यासोबत सर्वांनी याची आठवण करून दिली पाहिजे. मोबाईल व तंत्रज्ञान या गोष्टींची आपल्याला गरज आहे. पण निसगार्ला विसरून चालणार नाही. मी तयार केलेल्या या रिक्षात अनेक नागरिक आनंदाने प्रवास करतात. एकदा ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने रिक्षातून प्रवास करताना निसर्गाशी निगडित गाणे म्हणण्यास सुरुवात केली. तर लहान मुले एकदा प्रवास सुरु झाल्यावर तो संपला तरी उतरायचे नाव घेत नाहीत. मी नेहमीच्या रिक्षाप्रवासचे जे दर आहेत. त्याप्रमाणे दर आकारतो..............................................तांबोळी हे माझे फारच जवळचे मित्र आहेत. त्यांनी ही संकल्पना लोकांसमोर मांडली याचे मला कौतुक वाटते. पूर्ण पुण्यात तुम्हाला असे वाहन कुठंही पाहायला मिळणार नाही.निसर्ग वाचवा असा संदेश देण्याची नवीन संकल्पना नागरिकांना खूपच आवडत आहे.- सुफीयान खान , तांबोळींचा सहकारी.............................................अत्तराचा सुगंध, पक्षांची किलबिल, हिरवेगार वातावरण अशा सर्व गोष्टी या रिक्षात पाहायला मिळतात. आपण प्रवास करताना सर्व काही विसरून आणि मोबाईल बाजूला ठेवून प्रवासाचा आनंद लुटतो. राहुल रजपूत, प्रवासी 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाenvironmentवातावरण