शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 75 रुपयांत तिकिटासाठी तुडुंब गर्दी; प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:09 IST

तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात

पुणे : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त १६ सप्टेंबरला देशभरातील हजारो मल्टिप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांना तिकीट मिळणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 16 सप्टेंबरला तसे होऊ शकले नाही. असोसिएशनने नंतर पुन्हा जाहीर केले की, राष्ट्रीय चित्रपट दिन आता 23 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशात ७५ रुपयात चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातही सवलतीत चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी असून सर्व सिनेमागृह हाऊसफुल्ल झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर विविध पोस्ट येऊ लागल्या आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असा सवाल एका मराठी दिग्दर्शकाने उपस्थित केला आहे. 

चित्रपट दिनानिमीत्त १६ सप्टेंबरला ७५ रुपयात चित्रपट पाहण्याची संधी मिळाणार होती. परंतु सिनेमागृह मालकांच्या आग्रहास्तव ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आणि २३ सप्टेंबर निश्चित झाली. त्यानंतर २२ तारखेला चित्रपटाच्या बुकिंगने जोर धरला होता. बुक माय शो वर तर दुपारनंतर फिलिंग फास्ट तिकीट विक्री सुरु होती. रात्री तर ९० टक्के चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. नागरिकांना तिकीट न मिळाल्याने ते सोशल मीडियावर  हाऊसफूल्लच्या पोस्ट टाकू लागले आहेत. त्यातच एका दिगदर्शकाने अशी पोस्ट केली आहे. ''आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. 

कोरोना काळात शासनाने चित्रपटगृहांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली होती. त्यावेळी त्यांच्याकडून चित्रपटांचे तिकीट दर वाढवण्यात आले. तरीही प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली नाही. मनोरंजनाची आवड असणाऱ्यांनी वाढलेल्या दराचा विचार न करता चित्रपट पाहण्यास प्राधान्य दिले. पण कोरोनाचा वेग कमी झाल्यानंतर शासनाकडून सर्व काही निर्बंधमुक्त करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नाट्यगृह, सिनेमागृह, हॉल समारंभ, लग्न, कार्यक्रम यावरून ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात आली. पण त्यानंतरही चित्रपटगृहांनी तिकीट दर कमी केले नाहीत. कोरोना काळात वाढवलेल्या तिकीटदरातच अजूनही नवीन चित्रपटांची तिकीट विक्री केली जात आहे. त्यामुळे अभिनेते, दिगदर्शक यांना चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर वारंवार त्याचे प्रमोशन, जाहिरात करावी लागत असल्याचे दिसू लागले आहे. आजच्या सवलतीच्या तिकिटांसाठीची गर्दी पाहून मल्टिप्लेक्सने दर कमी करावेत. अशी चर्चाही शहरवासियांमध्ये दिसून आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाMONEYपैसाticketतिकिटIndiaभारत