शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीसाठी धावपळ

By admin | Updated: June 11, 2015 06:09 IST

दहावीचा आॅनलाइन निकाल लागल्याने अकरावीच्या आॅनलाइन केंद्रीय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे.

पिंपरी : दहावीचा आॅनलाइन निकाल लागल्याने अकरावीच्या आॅनलाइन केंद्रीय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे. आॅनलाइन दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीस वेग आला आहे. इच्छुक कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. निकाल समजल्याने कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार हे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीअर्ज भरताना अशा महाविद्यालयाला पसंती दिली जात आहे. यामुळे त्या महाविद्यालयचा कट आॅफ लक्षात घेतला जात आहे. त्यानंतर उर्वरित महाविद्यालयांचा क्रम निश्चित केला जात आहे. या नोंदीनंतर अर्ज अंतिम करण्यात येणार आहेत. या काळात टप्पा एकमध्ये अपूर्ण राहिलेला भाग भरता येणार आहे. ही दुरुस्ती आॅनलाइन करता येत आहे. टप्पा १ व टप्पा २ पूर्ण झाल्यानंतर तो अंतिम राहणार आहे. पिंपरीतील जयहिंद महाविद्यालय, भोसरीतील भैरवनाथ महाविद्यालय, पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालय, संत तुकारामनगर येथील भारतीय जैन महाविद्यालय येथे पिंपरी आणि भोसरी विभागातील नोंदणी केली जात आहे. आकुर्डीतील म्हाळसाकांत महाविद्यालय, चिंचवड येथील फत्तेचंद जैन महाविद्यालय आणि ताराबाई मुथा महाविद्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत. तसेच, सायबर कॅफेत किंवा घरातून आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. इतर बोर्डातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी जयहिंद महाविद्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. (प्रतिनिधी)