शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:26 IST

सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

पुणे :महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) घेत असताे. नियाेजित वेळापत्रकानुसार, ही परीक्षा रविवारी (दि. १५) हाेणार आहे. या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक हाेण्यासाठी लागणारी सेट ही पात्रता परीक्षा घेण्याचे काम पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग करते. यानुसार रविवारी (दि. १५) ४०व्या सेट परीक्षेचे आयोजन तब्बल १८ शहरांमधील विविध महाविद्यालयांत केले आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची व्हायरल हाेणारी बातमी फेक असून, त्यात काहीही तथ्य नाही. अशा बातम्या/ व्हिडीओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन सेट विभागाने केले आहे. तसेच याप्रकरणी बुधवारी रात्री तक्रारही दाखल केली आहे.पेपर फुटीबाबत चाैकशी करा!सेट पेपर फुटीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या प्रतिनिधींनी कुलगुरूंकडे केली आहे. तसा लेखी पत्रव्यवहारदेखील केला आहे, अशी माहिती विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे आणि रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे सूरज गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षा