Pune Navale Bridge: नवले पूल अपघातमुक्त करण्यासाठी दिशादर्शक फलकासह बसवण्यात येणार रंबल स्ट्रीप पट्टे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:53 PM2022-01-18T13:53:50+5:302022-01-18T14:00:17+5:30

धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टे, कॅट आय, रिफ्लेक्टिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविले असून, पथदिवेही बसविण्यात येत आहेत...

rumble street strips with directional signs navle bridge accident free murlidhar mohol | Pune Navale Bridge: नवले पूल अपघातमुक्त करण्यासाठी दिशादर्शक फलकासह बसवण्यात येणार रंबल स्ट्रीप पट्टे

Pune Navale Bridge: नवले पूल अपघातमुक्त करण्यासाठी दिशादर्शक फलकासह बसवण्यात येणार रंबल स्ट्रीप पट्टे

googlenewsNext

पुणे : दिशादर्शक फलक लावण्यापासून ते सर्व्हिस रोड बांधेपर्यंतची कामे युद्धपातळीवर करून, वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसराला अपघातमुक्त परिसर करण्यासाठीच्या दीर्घकालीन उपयायोजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या ठिकाणच्या दीर्घकालीन उपाययोजनांसाठी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

नवले पूल आणि एकूणच शहरातून मुंबई-बंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे सोमवारी आयोजन केले होते. या बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी रामचंद्र राव, प्रकल्प अधिकारी एस. एस. कदम, सल्लागार भारत तोडकरी, राकेश कोरी, आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक अंकित यादव, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार, आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, महामार्ग प्राधिकरणच्या वतीने दिशादर्शक आणि माहितीफलक लावण्यास सुरुवात झाली असून, यात ताशी ६० किमी, तीव्र उतार, हळू जा, अशा फलकांचा समावेश आहे. तुटलेल्या क्रॅश बॅरिअर्सची कामेही हाती घेतली आहेत. धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टे, कॅट आय, रिफ्लेक्टिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविले असून, पथदिवेही बसविण्यात येत आहेत.

महामार्गालगत सेवा रस्ता तयार करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात केली आहे. शिवाय नवले पुलाखाली असलेली अतिक्रमणे काढली जाणार असून, त्यानंतर महामार्ग प्राधिकरण सेवा रस्ता दुरुस्त करेल. नव्या कात्रज बोगद्यानंतर आणि दरीपुलाजवळ गॅन्ट्री तयार करून कायमस्वरूपी स्पीडगन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पोलीस आणि महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. नऱ्हे स्मशानभूमीसंदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून निर्णय होईल.

अशा होणार कायमस्वरूपी उपाययोजना

  • भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
  • विश्वास हॉटेल चौक ते पासलकर चौक आणि नवले पुलाच्या वडगाव बाजूचा सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करणे
  • सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरून सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार.

Web Title: rumble street strips with directional signs navle bridge accident free murlidhar mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.