शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भावनांवर स्वार सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही : भालचंद्र मुणगेकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:34 IST

देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानातून हे संकट निर्माण झाले आहे...

ठळक मुद्देपक्षभेद विसरून अर्थतज्ज्ञांच्या परिषदेचे आवाहनसार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवावीअर्थचक्र गतिमान होणे गरजेचे आहे व ते लोकांकडे पैसा आल्याशिवाय ते शक्य नाही..

पुणे: भावनांवर स्वार झालेल्या सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही. नोटाबंदी, जीएसटी या चुकीच्या निर्णयांमुळे देश आर्थिक मंदीत प्रवेश करत आहे. यातून वाचायचे असेल तर सत्ताधाऱ्यांनी पक्षीय भेद विसरून देशातील अर्थतज्ज्ञांची एक गोलमेज परिषद आयोजित करावी, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. काँग्रेसभवनमध्ये मुणगेकर यांनी अर्थव्यवस्थेपुढील मंदीचे आव्हान व त्यावरील उपाययोजना या विषयांवर माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी यावेळी उपस्थित होते. मुणगेकर म्हणाले, देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानातून हे संकट निर्माण झाले आहे, मात्र ते मान्य करायला त्यांचा अहंकार आड येतो आहे. अर्थचक्र निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रांसमोर आर्थिक अडचणी तयार होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. ते भान दिवंगत अरूण जेटली यांच्याकडे होते, मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये आता असे कोणीही नाही व त्यांना कोणाचे ऐकायचेही नाही.  आर्थिक अडचणी स्पष्ट करताना मुणगेकर म्हणाले, चार वर्षांपुर्वी घेतलेला नोटाबंदी व दोन वर्षांपुर्वी घेतलेला जीएसटीचा निर्णय या सगळ्याच्या मुळाशी आहे. छोटे, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे त्यातून मोडले. बचत, गुंतवणूक, आयात, निर्यात, औद्योगिक उत्पादन, रोजगार या अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्वच घटकांवर गंभीर परिणाम झाले आहेत. कोळसा, स्टील, खते, मिनरल्स या उद्योगांचे उत्पादन घटत आहे. हे कशामुळे होत आहे हे कळत नसल्यामुळेच कॅब सारख्या वाहनव्यवस्थेवर त्याचे खापर फोडण्याचा वेडेपणा अर्थमंत्री करत आहेत. यातून वाचायचे असेल तर देशातील अर्थतज्ञांना एकत्र करून राज्यकर्त्यांनी त्यांची गोलमेज परिषद आयोजित करून तिथे हा विषय मांडायला हवा. चचेर्तूनच उपाययोजना सापडतील.

सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवावीअर्थचक्र गतिमान होणे गरजेचे आहे व ते लोकांकडे पैसा आल्याशिवाय ते शक्य नाही. पैसा आणायचा असेल तर मग खासगी गुंतवणूक सोडून सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी. काही उद्योगांना जीएसटीत सवलत द्यायला हवी. वाहन व बांधकाम या दोन्ही क्षेत्रांना प्राधान्य द्यावे तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवावा. त्यामुळे स्थितीत थोडातरी फरक पडेल असे मुणगेकर म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्थाBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरBJPभाजपाGovernmentसरकार