बेमुदत बंदच्या इशाऱ्यानंतर RTO ची पळापळ, रॅपीडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 08:57 IST2022-11-25T08:57:11+5:302022-11-25T08:57:54+5:30

राज्यभरात बाईक टॅक्सी सर्विस देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल...

RTO's runaway after warning of indefinite shutdown, case filed against Rapido's Jagdish Patil | बेमुदत बंदच्या इशाऱ्यानंतर RTO ची पळापळ, रॅपीडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा दाखल

बेमुदत बंदच्या इशाऱ्यानंतर RTO ची पळापळ, रॅपीडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी/किरण शिंदे : कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीर ऑनलाइन ॲप सुरू करून राज्यभरात बाईक टॅक्सी सर्विस देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी 418, मोटार वाहन कायदा क 66, 93, 192 (अ), 146, 193, 197 व आय टी ऍक्ट 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सुयश प्लाझा भांडारकर रोड या कंपनीच्या जगदीश पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे आरटीओतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले (वय 38, रा. त्रिदलनगर, येरवडा, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रॅपिडो (The Roppen Transportation Services Pvt. Ltd.) या कंपनीला महाराष्ट्र राज्याचा अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा कोणताही परवाना नसताना कंपनीने बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे. पुणे शहरासह राज्यभरात विनापरवानगी आणि बेकायदेशीर ऑनलाईन ॲप सुरू करून ही सर्विस सुरू होते. ऑनलाइन ॲपवरून प्रवाशांची बुकिंग करून बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक केली जात होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर बाईक टॅक्स विरोधात रिक्षा संघटनांनी 28 नोव्हेंबर रोजी बंदची हाक दिली होती. बघतोय रिक्षावाला संघटनेने हा बंद पुकारला होता. त्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला होता. मात्र आंदोलन होण्यापूर्वीच बेकायदेशीर सर्विस देणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: RTO's runaway after warning of indefinite shutdown, case filed against Rapido's Jagdish Patil