डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:31 IST2021-06-24T16:28:33+5:302021-06-24T16:31:52+5:30

शनिवार पासून डेक्कन एक्सप्रेस व डेक्कन क्वीन धावणार

The royal pomp of the Deccan Queen's Vistadom coach! You can see the beauty of the ghat from the coach | डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

ठळक मुद्देएलएचबी कोच असलेला हा देशातील पहिला डबा ,यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते, एका डब्यांत 44 सीटची आसन क्षमता. हे सीट 180 डिग्री मध्ये फिरतात.

पुणे: पुणे - मुंबईरेल्वे मार्गावरून एकमेव धावणारी डेक्कन क्वीन आणि एक्सप्रेस शनिवारपासून सुरु होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली सेवा पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रथम डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना घाटातील सौदर्य पाहता येणार आहे.

प्रवाशांना लोणावळा -  खंडाळा येथील निसर्गसौंदर्य, माथेरान टेकडीवरील हिरवळ, सोनगीर टेकडी, दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या  निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेता येणार आहे. मुंबई - गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

डेक्कन एक्सप्रेस शनिवारी सकाळी  7  वाजता मुंबई स्थानकावरून सुटेल. पुण्याला 11 वाजुन 5 मिनिटांनी पोहचेल.  हीच गाडी पुणे स्थानकावरून दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी निघेल. सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला पोहचेल.  डेक्कन क्वीन ही गाडी 25 जून रोजी मुंबई सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटानी निघेल. पुण्याला रात्री 8 वाजून 25 मिनिटाला पोहचेल. 26 जून रोजी पुणे स्थानकावर याची नियमित सेवा सुरू होईल. 

विस्टाडोमची  वैशिष्ट्ये

1.एलएचबी कोच असलेला हा देशातील पहिला डबा ,यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते.
2.ताशी 180 किमी वेगाने धावणारा. देशात सध्या हा वेग सर्वाधिक आहे.
3.मोठ्या प्रमाणांत काचेच्या खिडक्या व काचेचे छप्पर. त्यामुळे प्रवाशांना बाजूचे सोंदर्य सहज पाहता येणार.
4.डब्यांच्या एका बाजूला मोठी मोकळी जागा. प्रवासी येते उभे राहून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
5.एका डब्यांत 44 सीट ची आसन क्षमता. हे सीट 180 डिग्री मध्ये फिरतात.
6.संगीत प्रेमींसाठी डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पीकर्स
 7.वायफाय ची सुविधा.

Web Title: The royal pomp of the Deccan Queen's Vistadom coach! You can see the beauty of the ghat from the coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.