शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब तयार

By admin | Updated: January 30, 2015 03:34 IST

अवघ्या १५ दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होत आहे.

विशाल आसवले, टाकवे बुद्रुकअवघ्या १५ दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होत आहे. मावळचा शेतकरी व्हॅलेंटाइन डेसाठी नियोजन करून फुल उत्पादन घेत असतो. त्यासाठी ते एक ते दोन महिने अगोदर तयारी सुरू करतात. १ ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये गुलाबांच्या झाडांचे कटिंग केले जाते. त्यानंतर विविध प्रकारची खते, औषधे दिले जातात. ४५ ते ५० दिवसांत येण्यासाठी खूप काळजी घेतली जाते. नियोजनानुसार २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत फुले विक्रीसाठी तयार केली जातात. या वर्षी आभाळ येण्याचे प्रमाण कमी आहे. पोषक वातावरणामुळे गुलाबावर जास्त प्रमाणात किड न पडल्याने फुले अधिक टवटवीत राहण्याची काळजी शेतकरी घेत आहेत. या वर्षी रोगाचे प्रमाण कमी असल्याने अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.व्हॅलेंटाइन डेसाठी लाब गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यात टॉप सिक्रेट, सामुराई, बोरडेक्स, कप्पर क्लास या जातींना विशेष मागणी असते.त्या पाठोपाठ गोल्डस्ट्राईक (पिवळा), पॉयझन (पिंक), भावलॉच (पांढरा), ट्रॉपिकल (नारंगी), झाकेरा (पिंक) या जातींना मागणी असते. फुलाचे दर प्रति सेंटिमीटरवर अवलंबून असतात. ४० सेंमी फुलांचे दर ८ ते १० रुपये, ५० सेंमी फुलाचे दर १० ते १२ आणि ६० सेंमी फुलाचे दर १२ ते १४ रुपयापर्यंत आहेत. ही फुले १० ते १२ दिवसांच्या कालावधीत विकली जातात. मागणी तेजीत असल्याने ही निर्यातक्षम फुले स्थानिक बाजारातही १० ते १२ रुपयेपर्यंत विकली जातात. प्रति एकरी ३० ते ४० हजारांच्या आसपास ही फुले मिळतात. निर्यातीला चांगला दर मिळाला तर प्रति फुलाला १५ ते १६ रुपये मिळतात. म्हणजे ५ ते ६ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मावळातील गुलाब कोठारे फ्लोरा, आरईव्ह फ्लोरा, सोलकस फ्लोरा या कंपन्यांच्या अंतर्गत निर्यात केला जातो. मावळात फुल उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने तसेच लाल माती, मुबलक पाणी, अनुकूल वातावरण असल्याने येथे दिवसेंदिवस पॉलिहाऊसची संख्या वाढत आहे.