शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

छत कोसळून एक ठार

By admin | Updated: January 26, 2015 01:47 IST

बंद कंपनीमध्ये लोखंडी जुने शेड काढताना आधारात तुटल्याने छत आणि भिंतीचा काही भाग कोसळून एक जण ठार झाला असून,

पिंपरी : बंद कंपनीमध्ये लोखंडी जुने शेड काढताना आधारात तुटल्याने छत आणि भिंतीचा काही भाग कोसळून एक जण ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना भोसरी एमआयडीसीत रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेत साईनाथ गोविंद गाजनकर (रा. भोसरी) हा मजूर ठार झाला, तर एन. टी. कारखानीस (रा. चिंचवडगाव), देवराम दिघे (रा. सांगवी), ज्ञानेश्वर यादव (रा. लोहगाव) हे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एमआयडीसी, भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टीला लागून जे-३२६ ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल फोरम कार्यालयाजवळच्या स्मॅश एन्टरप्रायजेस कंपनी असून, सध्या ती बंद आहे. जुन्या मालकाने ती दुसऱ्याला चालविण्यास दिली आहे. त्यामुळे कंपनीचे नूतनीकरण सुरू केले होते. शेडमधील भिंत काढण्याचे काम २ दिवसांपासून सुरू होते. ७ ते ८ मजूर हे काम करीत होते. शेडचा मधला आधाराच निघाल्याने हे अवजड शेड कोसळले. त्यात भिंतीचा काही भागही कोसळला. त्यामध्ये गाजनकर यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. कारखानीस, दिघे, यादव हेही जखमी झाले. इतर मजूर सुदैवाने बचावले. खबर मिळताच भोसरी व संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ एमआयडीसी आणि भोसरी ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी शेड आणि भितींच्या ढिगारात शोध घेऊन अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यातील एक जण जागीच ठार झाला होता. जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाजनकर यांच्या नातेवाइकांनी वायसीएम शवविच्छेदनगृहाबाहेर गोंधळ घातला. जमाव शांत झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंदविला आहे.