शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

'रोजगार हमी'मुळे शेकडो मजुरांना दिलासा; बारामतीत 1 कोटी 10 लाखाची कामे सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:00 PM

अनेक मजूर शहरांमधून आपल्या गावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण

ठळक मुद्देपंचायत समिती आणि तहसील कार्यालयाच्या 71 कामांच्या माध्यमातून 552 मजुरांना काम स्थानिक व शहरातून गावाकडे स्थलांतर केलेल्या मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध

रविकिरण सासवडेबारामती : संचारबंदीमुळे  अनेक मजुरांचा रोजगार गेला आहे. अनेक मजूर शहरांमधून आपल्या गावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतू  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) स्थानिक व शहरातून गावाकडे स्थलांतर केलेल्या मजुरांना बारामती तालुक्यात हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे. शेकडो मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. रोजगार हमी अंतर्गत बारामती तालुक्यात सुमारे 1 कोटी 10 लाखांची कामे सध्या सुरू आहेत. बारामती तालुक्यात पंचायत समिती स्तर आणि तहसील कार्यालय स्तर यामध्ये 71 कामांच्या माध्यमातून  552 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. यामाध्यमातून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मजुरांना मजुरी मिळवुन देउन याचे योग्य नियोजन झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविण्याची ताकद या योजनेत आहे. हे बारामती तालुक्याच्या रोजगार हमी योजना विभागाने दाखवून दिले आहे. त्यामुळे  सार्वजनिक कामात विकासाची गंगा ठरु शकणार्‍या या योजनेकडे शहरी मजुरांचा देखील मोर्चा वळू लागला आहे.  केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मजूराला किमान 238 रुपये मजुरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढ देखील होते.

बारामती तालुक्यातील रस्ता,  घरकुल,  सिंचन विहीर,  कुक्कुटपालन या पंचायत स्तरावरील एकूण 41 लाख 1 हजार 800 रुपयांचे तर तहसील स्तरावरील रेशीम विकास तुती लागवड अंतर्गत तीन वर्ष मुदतीचे एकूण 69 लाख रुपयांचे काम सुरू आहे,  अशी माहिती रोजगार हमी विभाग पंचायत समिती बारामतीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहन पवार यांनी दिली.   संचारबंदीमुळे बांधकाम व्यवसाय, दळण-वळण, बाजार समिती लिलाव बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न मोठा आहे.   परिणामी या आणीबाणीच्या स्थितीमध्ये अनेक मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेने आधार दिला आहे. 

या योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त सार्वजनिक लाभाची कामे व्हावी यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र पाठवण्यात आले आहे.  यामध्ये मजुरांचा सहभाग वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.  पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते,  पाणी पुरवठा विहिरी व ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात येतील.  -    राहूल काळभोर गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती 

बारामती तालुक्यात सुरू असणारी कामे ( पंचायत समिती स्तर )

कामाचे स्वरूप                     कामाची संख्या             मजूर संख्या              कामाची किंमत रस्ता                                          1                              230                        14, 00, 000 घरकुल                                      40                           134                          8, 56, 800सिंचन विहीर                             6                               77                           18, 00, 000 कुक्कुटपालन प्रकल्प                  1                               3                             45, 000

तहसील स्तर 

रेशीम विकास तुती लागवड         23                       108                     69, 00, 000 (तीन वर्ष मुदत) 

 

टॅग्स :BaramatiबारामतीLabourकामगारState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या