शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

रोहित डागर ठरले उत्कृष्ट अश्वारोहक, थरारक प्रात्यक्षिकांना उपस्थितांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:05 AM

पुणे : अश्वारोहणाचे चित्तथरारक खेळ, आर्मी बँडचे संचलन आणि घोडेस्वारीच्या प्रात्यक्षिकांनी रेसकोर्स येथे सुरू असलेल्या साउदर्न स्टार हॉर्स २०१७ चा समारोप झाला

पुणे : अश्वारोहणाचे चित्तथरारक खेळ, आर्मी बँडचे संचलन आणि घोडेस्वारीच्या प्रात्यक्षिकांनी रेसकोर्स येथे सुरू असलेल्या साउदर्न स्टार हॉर्स २०१७ चा समारोप झाला. राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धेत उष्कृष्ट घोडेस्वार म्हणून वरिष्ठ गटात राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीतील लेफ्टनंट कर्नल रोहित डागर यांनी, तर कनिष्ठ गटात कॅडेट ओमकार दळवी यांनी सुवर्णपदक पटकावले.गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील रेसकोर्स येथे ‘साउदर्न स्टार हॉर्स २०१७’ या अश्वारोहणाच्या स्पर्धा सुरू होत्या. रविवारी ‘ओपन जंप शो, ट्रिकी रायडिंग पिकिंग, हँकी (रूमाल) पिकिंग तसेच पोलो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन स्पर्धेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी. के. हारिस उपस्थित होते. याबरोबरच लष्करातील अधिकारी, तसेच अ‍ॅक्वेस्टेरियनचे प्रमुख मान्यवर या वेळी उपस्थित होते. याबरोबर विविध शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसेच नागरिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्टीय सुरक्षा प्रबोधिनीच्या छात्रांनी घोड्यांवरून ध्वजाचे संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर ‘ओपन जंप शो’ला सुरुवात करण्यात आली. एनडीएचे लेफ्टनंट कर्नल रोहित डागर यांनी त्यांच्या अर्जुन या अश्वाला नियंत्रित करत उभारण्यात आलेले अडथळे अलगद पार करत सुवर्णपदक पटकावले. यानंतर हवालदार राजबीर सिंग आणि खुल्या गटातून स्पर्धेत सहभागी झालेली संयोगिता कडू हे दोघे रजतपदकाचे मानकरी ठरले, तर सेना सेवा कोअरचे हवालदार सतिंदरसिंग हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले.चिल्ड्रन रायडिंग स्पर्धेत ग्रीन फिल्ड स्कूलचा विद्यार्थी हर्षवर्धन जयंत याने सुवर्णपदक पटकावले. ग्रीन फिल्ड स्कूलच्या सिद्धार्थ अनयोग या विद्यार्थ्याने रजत, तर दिग्विजय हॉर्स अ‍ॅकॅडमीच्या सोहम फडे याने कांस्यपदक पटकावले.<राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संघ ठरला पोलोचा मानकरीसाउदर्न स्टार हॉर्सच्या समारोपाप्रसंगी ‘पोलो’ची स्पर्धा घेण्यात आली. तोफखाना विरुद्ध राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा संघ असा सामना रंगला. अर्धा तास चाललेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या संघाने आघाडी घेतली. तोफखाना संघाविरुद्ध त्यांनी ५ गोल केले, तर तोफखाना संघ केवळ तीन गोल करू शकला. अश्वारोहणाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. ट्रिकी रायडिंग प्रकारात जमिनीवर ठेवलेले लक्ष्य वेगात येऊन छात्रांनी उचलले. ट्रीपल टेन पिकिंग आणि हँकी पिकिंग या प्रकारात घोड्यावर नियंत्रण मिळवत वेगाने येऊन तलवारीने जमिनीवरील लक्ष्य छात्रांनी उचलत रसिकांची मने जिंकली.

टॅग्स :Puneपुणे