शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

By admin | Updated: May 10, 2017 03:58 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते; परंतु अवघ्या पंजोबा उपार्जित काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करीत वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुखत्वेकरून या भागातील विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे हे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये त्यात पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षभरातील तीन महिने या भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या जिवावर काढावे लागत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी शासनाकडून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले. परंतु, या भागात पडणाऱ्या दुष्काळापुढे या जलस्रोतांनीही गुडघे टेकले आहेत. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्यातील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले. या पाण्याची दुर्गंधी येत असून, पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. परिणामी, या भागातील आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत अहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असूनही आदिवासी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. पाणी आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. बस झालं आता नुसतीच आश्वासनं अन् नुसताच तोंडावरून पोचारा. आता आम्हा आदिवासींनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे,’ असे आदिवासी बांधव काळू बाळू लोहकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, तळेघर, राजपूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरी, माचीची वाडी, काळवाडी नं. १ व नं. २, नानवडे, माळीण, आमडे, कोंढरे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, आवळेवाडी, घोडेवाडी, माळवाडी, घोटमाळ, गोहे बुद्रुक, बोरीची वाडी, पाटीलबुवाची वाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पसडळवाडी, पाचवड, पोटकुलवाडी, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत.