robbery in pune's corporater house ; seven lakh rupees stolen | पुण्यातील नगरसेविकेच्या घरी चाेरी ; सव्वासात लाख रुपये चाेरट्यांनी केले लंपास
पुण्यातील नगरसेविकेच्या घरी चाेरी ; सव्वासात लाख रुपये चाेरट्यांनी केले लंपास

धनकवडी :  कानिफनाथ चौकालगतच्या मुंगळेअण्णानगर येथील भर वस्तीत राहणाऱ्या नगरसेविकेच्या घरात मंगळवारी दुपारी झालेल्या चोरीच्या घटनेत कपाटत ठेवलेले सव्वासात लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत.  

धनकवडी पोस्ट ऑफिस चौक या गजबजलेल्या परिसरात नगरसेविका अश्विनी भागवत राहतात. त्यांच्या  दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन चोरट्यांनी हि रक्कम लांबवली आहे. सागर यांचे मित्र अमोल पाटील यांचे लग्न गुरूवारी होते. तत्पुर्वी पाटील यांनी लग्नाच्या खरेदीसाठी सव्वा पाच लाख रूपये सागर यांच्याकडे ठेवले होते. सागर यांचे व्यवसायातील दोन लाख रूपयेही त्याच कपाटाच्या ड्रावरमध्ये होते. सर्वसाधारण सभेसाठी अश्वीनी त्यांचे पती सागर भागवत हे साडेअकरा वाजता महापालिकेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. तळ मजल्यावर त्यांची मुलं खेळत  होती. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून जीना आहे. त्याचा फायदा घेवून चोरट्यांनी हात साफ केले. दरम्यान अमोल पाटील यांनी सागर यांना रक्कमेसाठी कॉल केला. सागर यांनी मुलीला सांगतो तीच्याकडून घेवून जा असे सांगितले. वरच्या मजल्यावर जाऊन पाहताच मुलीला ड्रावर उघडा असून त्यात रक्कम नसल्याचे दिसले. माहिती मिळताच महापालिकेत असलेले सागर हे तत्काळ घरी आले. वस्तुस्थिती पाहून सागर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.  मंगळवारी दुपारी दोनच्या समोरच चोरी झाली. परिसरातील सिसीटिव्ही फूटेज तपासण्यात येत आहे. सागर भागवत यांच्या घरासमोर असलेल्या एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये दोन वाजता एक मुलगा आत जावून काही मिनिटात हातात पिशवी घेऊन बाहेर पडल्याचे निदर्शनास आले आहेे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
 


Web Title: robbery in pune's corporater house ; seven lakh rupees stolen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.