शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकाळभोर येथे चोरट्यांनी केला पंधरा तोळे सोन्याचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:22 IST

बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख  ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्दे या चोरीप्रकरणी तुकाराम दगडू काकडे ( वय ५९, रा. काकडे मळा, थेऊर, ता. हवेली ) यांनी दिली फिर्याद दिली

लोणी काळभोर :  थेऊर येथे बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख  ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या चोरीप्रकरणी तुकाराम दगडू काकडे ( वय ५९, रा. काकडे मळा, थेऊर, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. काकडे यांच्या  नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने ते आपली पत्नी पुष्पा, मुलगा विनोद व सुन रेश्मा यांच्यासमवेत शेजारील खोल्यांत राहत आहे. शेजारी त्यांच्या शेजारी शेतात काम करणारे हनुमंत हवालदार व लक्ष्मण थिटे हे कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा दुसरा मुलगा थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे हे आपल्या मुलांबाळांसह पुणे कॅम्प येथे राहतात. मुलगा विनोद १६ मार्च रोजी पत्नीला घेऊन पुणे येथे दवाखान्यात गेला होता. ऊशीर झाल्याने तो भाऊ नवनाथ यांच्याकडे राहिला. घटनेच्या दिवशी तुकाराम काकडे व त्यांची पत्नी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर झोपले. त्यापूर्वी त्यांनी स्वयंपाकघर व त्यांचा मुलगा विनोद पुण्याला मुक्कामी राहिल्याने त्याची खोलीला कुलूप लावले होते. परंतु, शनिवारी पहाटे ४ - ३० वाजण्याच्या सुमारास तुकाराम काकडे नेहमीप्रमाणे उठले व दरवाजा उघडण्यास गेले. परंतू,बाहेरून कडी लावल्याने तो उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजारी राहत असलेल्या हनुमंत हवालदार यांच्याशी संपर्क साधला व दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यांचाही बाहेरून दरवाजा लावल्याने उघडत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काकडे यांनी दुसरा कामगार बाबा कवठे याला संपर्क साधला. त्याने सर्व खोल्यांच्या कड्या उघडल्या.काकडे यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता त्यांना खोली क्रमांक १, ३, ५, ६ या चार खोल्यांच्या दरवाजाचे कडी व कोयंडे तुटलेले, दरवाजे अर्धवट उघडे अवस्थेत आणि खोल्यातील सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरफोडी झाली असल्याची खात्री पटल्यानंतर सदर घटनेविषयी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता पत्नी पुष्पा खोली क्रमांक १ मधून मोहनमाळ, मुलगा विनोद याच्या खोली क्रमांक २ मधून दोन साखळ्या , ५ अंगठ्या, कानातील रिंगा, झुमके व वेल असा एकूण ४ लाख ३४ हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज  चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करत आहेत.  

................. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाGoldसोनंPoliceपोलिस