देशी दारुच्या दुकानावर टाकला दरोडा, टोळक्याने ३० हजार रुपयांची रोकड नेली जबरदस्तीने चोरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 19:01 IST2021-05-12T19:01:12+5:302021-05-12T19:01:28+5:30

तिघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

Robbery at local liquor shop, gang steals cash of Rs 30,000 | देशी दारुच्या दुकानावर टाकला दरोडा, टोळक्याने ३० हजार रुपयांची रोकड नेली जबरदस्तीने चोरून

देशी दारुच्या दुकानावर टाकला दरोडा, टोळक्याने ३० हजार रुपयांची रोकड नेली जबरदस्तीने चोरून

ठळक मुद्देदुकानमालक व मॅनेजरला पालघनसारखे लोखंडी हत्याराने मारण्याची दाखवली भिती

पुणे: देशी दारु दुकानमालक व मॅनेजरला पालघनसारखे लोखंडी हत्याराने मारण्याची भिती दाखवून टोळक्याने गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पिट्या, हुक्या व इतर तीन साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर रमेश पाटील (वय ५०, रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पाटील यांचे नर्‍हे चौकात देशी दारुचे दुकान आहे. दुकानात शिवप्रकाश अग्राणी हे मॅनेजर असतात. २४ फेब्रवारीला रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पिट्या व त्याचे साथीदार दुकानात शिरले. त्यांनी मॅनेजर अग्राणी यांना पालघनने मारण्याची धमकी दिली. गल्ल्यातील सर्व पेसे दे, माझे नाव हुक्या आहे. नाही तर तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे शिवप्रकाश हे गल्ल्यापासून घाबरुन बाजूला गेल्यावर पिट्याने गल्ल्यातील ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेने घाबरुन मॅनेजर शिवप्रकाश हा उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी गेला. रमेश पाटील हेही लातूरला आपल्या मुळगावी गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Robbery at local liquor shop, gang steals cash of Rs 30,000