पुणे जिल्ह्यात भरदिवसा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा; 2 कोटी 31 लाख रुपयांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:52 PM2021-10-21T15:52:27+5:302021-10-21T15:56:45+5:30

अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले होते

robbery bank of maharashtra branch pimperkhed shirur pune district | पुणे जिल्ह्यात भरदिवसा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा; 2 कोटी 31 लाख रुपयांची चोरी

पुणे जिल्ह्यात भरदिवसा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा; 2 कोटी 31 लाख रुपयांची चोरी

Next

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर भरदिवसा दरोडा पडला आहे. या दरोड्यात दोन कोटी 31 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहकदेखील उपस्थित होते.

अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कार गाडीमधून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.

पिंपरखेडपासून शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले. पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सुचना देण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र या परीसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक वित्तीय संस्था व बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read in English

Web Title: robbery bank of maharashtra branch pimperkhed shirur pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app