रोडरोमिओंना पोलिसांनी घडवली अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 07:55 PM2019-08-16T19:55:43+5:302019-08-16T20:18:55+5:30

दोन गटात भांडणे करणे, केसांची स्टाईल बदलणे, कानात बाळी घालने तसेच टवाळखोरपणा गटागटामध्ये भांडणे करणे शांततेचा भंग करणे

Roadroms were beat by the police | रोडरोमिओंना पोलिसांनी घडवली अद्दल

रोडरोमिओंना पोलिसांनी घडवली अद्दल

Next

पुणे :चांदुस येथे किरकाेळ कारणामुळे महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी टवाळखाेरांची टगेगिरी वाढली होती. याबाबत खेड पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांना चांगला चोप देऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करीत समज देत देऊन सोडून देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की किवळे (ता खेड ) या ग्रामीण भागात सुद्धा ही युवकांमध्ये गॅंग वार व टोळीयुद्ध भडकले आहे. दोन गटात भांडणे करणे, केसांची स्टाईल बदलणे, कानात बाळी घालने तसेच टवाळखोरपणा गटागटामध्ये भांडणे करणे शांततेचा भंग करणे ऐकमेकांना वरती वर्चस्व दाखवणे, दहशत निर्माण करणे प्रकार सुरू झाले होते. तसेच टारगटपणा करणाऱ्या किवळे येथील रस्त्याच्या बाजूला व इतर परिसरात टोळक्याने उभे राहून टिंगलटवाळी करणे, छेड काढणे, सुसाट वेगात वाहन चालवून स्टंटबाजी करणे याबबत तक्रारी होत्या. त्या नुसार पोलिसांनी संबधित जवळपास ८ टवाळखोर युवकांना पकडून पोलिसांनी पकडून चांगलाच चोप देऊन  खेड पोलीस ठाण्यात आणले. सर्व मुलं अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावून घेत या मुलांना चांगलेच खडसावत समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी केलेल्या टवाळखोर मुलांवरील या कारवाईचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अरविंद चौधरी यांनी सांगितले की , इथून पुढच्या काळात देखील टारगटपणा करणाऱ्या मुलांवर अशीच कारवाई करणार असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Roadroms were beat by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.