शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

लालफितीच्या कारभारात निधी रद्द होण्याचा धोका

By admin | Updated: December 22, 2014 05:23 IST

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) ३०० बस खरेदीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी रद्द होण्याची शक्यता

पुणे : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) ३०० बस खरेदीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने दि. १० डिसेंबरपर्यंत आपल्या हिश्श्याचा निधी जमा केल्यानंतरच केंद्राकडून हा निधी मिळणार होता. मात्र उदासीन पालिका प्रशासनाने अद्याप पैसे जमा न केल्याने केंद्राच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा बोजा असल्याने बस दुरुस्त करणे शक्य होत नाही. परिणामी दररोज ६००पेक्षा जास्त बस जागेवर उभ्या असतात. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा देणे शक्य होत नाही. असे असताना नवीन बस खरेदीसाठी ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारा निधी मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून धडपड करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने उदासीनता दाखवत याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील ३०० बसेस खरेदी प्रक्रिया मागील दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित राहिली आहे. पालिका व पीएमपीकडून ही प्रकिया वेळेत होत नसल्याने केंद्राच्या नगरविकास विभागाने महामंडळास आॅक्टोबर महिन्यात पत्र पाठवून बस खरेदीचा पहिला हप्ता दोन महिन्यांत भरण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबत पीएमपीने पालिकेला दोन वेळा पत्रव्यवहार करून माहिती दिली. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत अद्याप आपल्या हिश्श्याचे पैसे भरलेले नाहीत. नगरविकास विभागाने १० डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. ही मुदत उलटून गेली असल्याने बस खरेदीच्या निधीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. नगरसेवक संजय बालगुडे म्हणाले, बस फंडिंग गाईडलाईननुसार पालिकेचा निधी वर्ग झाला नाही तर केंद्र शासनाचा निधी रद्द होईल. याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.(प्रतिनिधी)