शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शाखेच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:59 PM

खा. सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत जास्तच भर पडत चालली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शाखेची परीक्षा तोंडावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या परिक्षेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. देशमुख यांनीही लागलीच सुळे यांची या मागणीची दखल घेतली असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे कळवले आहे. 

वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होत आहेत. त्याच वेळी राज्यातील सुमारे ४५० विद्यार्थी आणि तेवढ्याच पालकांना कोरोनाची लागण झाली आहे.  याशिवाय अनेक उद्यार्थ्यांना अभ्यासाची साधनेही सध्या उपलब्ध नाहीत, अशी परस्थिती आहे. 

 राज्यभरातील जवळपास ५० हजार विद्यार्थी वैद्यकीय शाखेची ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्राद्वारे याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार सुळे यांनी तात्काळ त्यांच्या मागणीचा विचार करून अमित देशमुख यांच्याकडे हा विषय मांडत विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत देशमुख यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMedicalवैद्यकीय