भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरले; धानोरीतील युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:33 IST2018-02-10T18:31:37+5:302018-02-10T18:33:30+5:30
भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरले; धानोरीतील युवकाचा मृत्यू
पुणे : भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. या प्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.