पत्नीच्या त्रासाला कंटाळून येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:10 PM2018-02-07T15:10:35+5:302018-02-07T15:13:31+5:30

पत्नीच्या त्रासाला कंटाळून येथील युवकाने आत्महत्या केली आहे. गोपालसिंग सुग्रीवसिंग चौहान (वय ३०, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, इमारत क्र. १, घर क्र. १४०७) असे या युवकाचे नाव आहे. 

Youth suicide in Maharashtra Housing Board in Yerwada, tired of wife's tragedy | पत्नीच्या त्रासाला कंटाळून येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे युवकाची आत्महत्या

पत्नीच्या त्रासाला कंटाळून येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे युवकाची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालसिंग यांची आई शिलादेवी यांनी पोलिसांत दिली फिर्यादचिठ्ठीत लिहिले, आत्महत्येस पत्नीला जबाबदार धरून तिला शिक्षा व्हावी

येरवडा : पत्नीच्या त्रासाला कंटाळून येथील युवकाने आत्महत्या केली आहे. गोपालसिंग सुग्रीवसिंग चौहान (वय ३०, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, इमारत क्र. १, घर क्र. १४०७) असे या युवकाचे नाव आहे. 
या प्रकरणी गोपालसिंग यांची आई शिलादेवी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते दोघे जम्मू काश्मीर, कलकत्ता, महाराष्ट्र येरवडा येथे नांदत असताना घरी फोन करून देत नसायची. त्याने रजा घेतल्यास गावी जाऊ द्यायची नाही, तू तुझ्या आई वडिलांना भेटायला गेल्यास मी जाळून घेईन, गळफास लावून घेऊन तुम्हा सगळ्यांना अडकवून टाकीन, असे धमकावत असे. वाद घालून शिवीगाळ, मारहाण करून मानसिक, शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. आत्महत्येस पत्नीला जबाबदार धरून तिला शिक्षा व्हावी, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पुढील तपास पीएसआय अनिल लोहार करीत आहेत.

Web Title: Youth suicide in Maharashtra Housing Board in Yerwada, tired of wife's tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे