शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तन'परंपरेला नव संजीवनी; वैविध्यपूर्ण कीर्तनांची रसिकांना मिळणार पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 2:11 PM

यु ट्यूब वर 'कीर्तनविश्व' चॅनेलची निर्मिती; राज्यातील दिग्गज कीर्तनकारांचा असणार सहभाग

दीपक कुलकर्णी- पुणे : आपल्याला कीर्तन परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे.पूर्वीच्या काळी समाज प्रबोधनासाठी देखील थोर संत महात्म्यांनी, समाजसुधारकांनी कीर्तन सेवेचा आधार घेतलेला देखील दिसून येते. मात्र काळाच्या ओघात मनोरंजन, प्रबोधनाची साधने बदलत गेली आणि ही कीर्तन परंपरा आज कुठेतरी लुप्तप्राय अवस्थेत आहे. मात्र, आता पुन्हा जय जय राम कृष्ण हरी, नानाविध अभंग, यांचे स्वर कानावर पडणार आहे. कीर्तन परंपंरेला नवी संजीवनी देण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तनविश्व' हे यु ट्यूब चॅनेल सुरु होत आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कीर्तन क्षेत्रातील वेगवेगळ्या परंपरा,कीर्तनकारांची ओळख होणार आहे.

विश्व मराठी परिषद आणि भीष्म इंडिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन विश्व हे यु ट्यूब चॅनेल गुढी पाडव्याला सुरू होणार आहे. या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला तीन कीर्तने सादर केली जाणार आहे. यात नारदीय, रामदासी, एकनाथी,वारकरी, राष्ट्रीय, वैज्ञानिक कीर्तनेतुकडोजींच्या, दासगणू,गाडगे महाराजांच्या पठडीतले कीर्तन असणार आहे. नवीन पिढीसह आपल्या कीर्तन परंपरेची ओळख व्हावी, तसेच जुन्या लोकांना पुन्हा एकदा कीर्तनांचा आनंद मिळणार आहे. या कीर्तनांद्वारे ऐतिहासिक, स्वातंत्र्य संग्रामातील शौर्य कथा, महापुरुषांच्या कथा, शास्रज्ञ, संतांच्या कथांचा खजिना उलगडला जाणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, आपल्याला कीर्तनसेवेची मोठी परंपरा आहे.आणि या कीर्तनांचे वेगळेपण म्हणजे  त्यांनी सातत्याने मनोरंजनातून समाज प्रबोधनाची भूमिका निभावली आहे. आजची जीवनशैली प्रचंड धकाधकीची आहे. आणि त्यात सध्याच्या घडीला कोरोना संकटाने तर अवघ्या विश्वात प्रचंड दुःख, भीती, नैराश्य निर्माण झाले आहेत. मात्र या कीर्तनांच्या माध्यमातृन ती निराशा दूर होऊन आत्मविश्वास प्रेरणा,धारिष्ट्य, शक्ती,सकारात्मकता यांच्या जोरावर कोरोनाविरुद्धची लढाईत बळ मिळेल अशी आशा आहे. तसेच बौद्धिक, भावनिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक सांगीतिक, नैतिक आनंद मिळणार आहे.....कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना अनेक मर्यादा आल्या आहेत. त्यातून ऑनलाईन व्यासपीठाचा पर्याय समोर आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणून पुढील वर्षभर ऑनलाईन व्यासपीठावर सुरु राहील असा एखादा उपक्रम राबवयाचा होता. आणि तो एकाच माणसाने सादर करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कीर्तनाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना घेऊन करावा असे वाटले. आणि त्याच अनुषंगाने हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या ५२ आठवड्यांचे १५३ कीर्तने तयार आहे. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहवचण्याचा मानस आहे. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकAdhyatmikआध्यात्मिक