Chaskaman Dam | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:27 IST2023-03-23T15:25:13+5:302023-03-23T15:27:15+5:30
याबाबत आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती...

Chaskaman Dam | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता
पुणे : जिल्ह्यातील शिरुर व खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास १ हजार ३५६ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यांत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
फडणवीस म्हणाले की, चासकमान प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच अतिक्रमणाबाबतही काही तक्रारी आहेत,त्याची चौकशी करण्यात येईल. जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या कामाचेही सर्वेक्षणाचे काम सुरु असून, त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.