शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 21:10 IST

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़.

ठळक मुद्देसायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचे पथक पुण्यातील पहिल्या सायबर पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन जानेवारीपासून आतापर्यंत सायबर गुन्ह्याविषयी ४ हजार ४६१ तक्रार अर्ज

पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़. प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार असून या गुन्ह्यांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन होण्यासाठी दर आठवड्याला आढावा घेण्यात येऊन माहिती देवाण घेवाण करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़. पुण्यातील पहिल्या सायबर पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी करण्यात आले़. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत डॉ़. व्यंकटेशम यांनी सांगितले, जानेवारीपासून आतापर्यंत सायबर गुन्ह्याविषयी ४ हजार ४६१ तक्रार अर्ज आले आहेत़. त्यापैकी ३ हजार ५९२ अर्ज पोलीस ठाण्यांकडे हस्तांतरीत करण्यात आले असून ५५ गुन्हे दाखल झाले आहेत़. १ हजार ६५९ अर्ज प्रलंबित आहेत़ सध्या सायबर पोलीस ठाण्याला ४ पोलीस निरीक्षक व ९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक देण्यात आले आहेत़ गरज भासेल, त्यानुसार अधिक अधिकारी व कर्मचारी देण्यात येणार आहे़. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचे पथक असेल़. त्यांना सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य, मार्गदर्शन मिळेल़. प्रत्येक आठवड्याला पोलीस ठाण्यातील अधिकारी व सायबर सेलचे अधिकारी हे एकमेकाबरोबर तपासातील अडचणी, केलेला तपास या माहितीची देवाणघेवाण करतील़. जानेवारीपासून आतापर्यंत सायबर गुन्ह्यातील सायबर गुन्ह्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत़. गेल्या आठवड्यात ११ अर्जदारांना साडेतीन लाख रुपये मिळवून देण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले़. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे उपस्थित होते़. .................डीएसकेच्या ठेवीदारांना पैसे देण्यासाठी प्रयत्नडी़. एस़. कुलकर्णी यांच्या जप्त केलेली मालमत्ता तसेच त्यांचा वाहनांचा लिलाव लवकरात लवकर करुन त्यातून मिळणारे पैसे ठेवीदारांना कसे देता येतील याचा अभ्यास करण्यात येत असून त्यासाठी संबंधितांची बैठक घेण्यात येत आहे, असे डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले़. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे