शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक जिल्हा एक दस्त प्रणालीत गैरप्रकार, काटेकोर तपासणीचे महसूल विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:44 IST

- आतापर्यंत २०,६५६ दस्तांची नोंद, सर्वाधिक ४,८५० दस्त पुणे जिल्ह्यात

पुणे : एक जिल्हा एक दस्त प्रणालीत अनेक गैरप्रकार होत असल्याचे दिसून आले आहे. दस्तनोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी काळजी घेण्याच्या सूचना महसूल विभागाने केल्या आहेत. कोणताही दस्त करताना कागदपत्रांची अतिशय काटेकोरपणे तपासणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. सहजिल्हा निबंधकांनी याचा अहवाल पंधरा दिवसांत राज्य सरकारला द्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रणालीत राज्यात आतापर्यंत २० हजार ६५६ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. सर्वाधिक ४ हजार ८५० दस्त एकट्या पुणे जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहेत.

राज्य सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता हा कार्यक्रम आता एक जिल्हा एक नोंदणी असा राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ मेपासून जिल्हास्तरावर याची अंमलबजाणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रणालीत दस्त नोंदणी करताना अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये बनावट व्यक्तीस उभे करून दस्त नोंदणी करून घेणे, मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून दस्त नोंदणी करणे, डोगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनींची खरेदी व विक्री करणे, एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील हिस्सा विकणे, सामायिक मालकीच्या इमारतीत हिस्सेदाराने लीज डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील सदनिका व प्लॉट विक्री करणे, सातबारा उतारा व इतर अधिकारात राज्य सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे, देवस्थानच्या जमिनी पुजारी, गुरव यांच्या नावावर असल्याने त्याचे बेकायदा दस्त करणे असे गैरप्रकार होत आहेत.

हे गैरप्रकार रोखण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सहजिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हधिकारी यांनी विविध दस्त नोंदणी कार्यालयात कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकांना दस्त करताना कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व सरकारचा महसूल बुडणार नाही, याची काळजी घ्यावी. सहजिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करून राज्य सरकारला १५ दिवसात अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रणालीत १ मेपासून १० जूनपर्यंत राज्यात एकूण २० हजार ६५६ दस्तांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड